महायुतीत ट्विस्ट! मनपा निवडणुका स्वबळावर लढा; अजित पवार गटाच्या नेत्याचा वेगळा सूर

विधानसभा निवडणुकीनंतर(political updates) आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची तयारी दोन्ही आघाड्यांनी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील ठाकरे गटाने या निवडणुका स्वबळावर लढण्याची कालच केली होती. ठाकरे गटाच्या या गुगलीने महाविकास आघाडीत अस्वस्थता वाढली आहे. तर दुसरीकडे महायुती मात्र या निवडणुका एकत्रित लढण्याची तयारी करत आहे.

परंतु, येथेही आता मोठा ट्विस्ट आला आहे. अजित पवार गटाकडून(political updates) या निवडणुका स्वतंत्र लढण्यासाठी चाचपणी सुरू आहे का अशी शंका येऊ लागली आहे. कारण, अजित पवार गटाचे मोठे नेते नवाब मलिक यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी केली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक माटुंगा येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत नवाब मलिक यांनी स्वबळाचा नारा दिला. महापालिका निवडणूक आता स्वबळावरच लढली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षाला अजूनही मुंबई जिंकता आलेली नाही. येथील यश फार नाही.

महापालिकेत 14 पेक्षा जास्त नगरसेवक कधीच निवडून आले नाहीत. दुसऱ्या पक्षांशी युतीत असतानाही पक्षाच्या जागा वाढल्या नाहीत. आता तर पक्षात फूट पडली आहे त्यामुळे जास्त काळजीची गोष्ट आहे. कार्यकर्त्यांच्या मनातही चिंतेचं मळभ आहे. त्यांच्यात एक प्रकारचा संभ्रम आहे. महायुती म्हणून लढायचं की स्वतंत्र लढायचं याबाबतचा संभ्रम कार्यकर्त्यांच्या मनात कायम आहे, असेही नवाब मलिक यावेळी म्हणाले.

आपल्या पक्षाची ताकद जोपर्यंत वाढत नाही. तोपर्यंत पक्षाला कुणीही विचारात घेणार नाही. त्यामुळे आपले मित्र पक्ष आपल्याला सोबत घेतील हे विसरून जा असा इशारा त्यांनी दिला. पक्षाची ताकद निर्माण करायची असेल तर मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढावीच लागणार आहे, असे नवाब मलिक या बैठकीत म्हणाले. या बैठकीत आमदार सना मलिक, सिद्धार्थ कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे. आता काय होईल ते होईल. आम्हाला एकदा स्वबळ आजमावून पहायचं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढणार आहोत अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी काल प्रसारमाध्यमांना दिली होती.

हेही वाचा :

दिवसाची सुरुवात आनंदवार्ताने, पेट्रोल-डिझेलचे दर ‘इतक्या’ रुपयांनी घसरले?

तासंतास Instagram Reels पाहणे म्हणजे ‘या’ आजाराला आलिंगन देणे, वेळीच व्हा सावध

आता फक्त 250 रुपयात चालू करता येणार SIP, लवकरच लागू होणार नियम