ट्विस्ट वर ट्विस्ट, सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना वेगळाच संशय
अभिनेता सैफ अली खान याच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक(arrested) करण्यात आलेल्या शरीफुल इस्लाम शहजाद याच्या हाताचे ठसे आणि तपास अधिकाऱ्यांनी सैफच्या घरातून घेतलेले ठसे यांच्यात फरक असल्याचे आढळून आले आहे.
यामुळे, पोलिसांनी अटक(arrested) केलेली व्यक्ती आणि सैफच्या घरात घुसलेली व्यक्ती एकच आहे का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच, सैफच्या घरात चोरी करण्यासाठी एक नव्हे तर दोन व्यक्ती आल्या होत्या का, अशी शक्यताही बळावली आहे.
सैफवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या शरीफुल इस्लाम शहजादच्या वकिलांनी काही दिवसांपूर्वी हाच मुद्दा उपस्थित केला होता. सीसीटीव्ही मध्ये दिसणारी व्यक्ती आपण नाही, असा दावा शहजादने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.
शहजाद हा बांगलादेशी घुसखोर असून त्याने डावकी नदी ओलांडून भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर त्याने मेघालय ते आसाम, मग कोलकाता आणि मुंबई असा प्रवास केला होता. केवळ शहजादच नाही तर त्याचे वडील रुहुल अमीन यांनी देखील सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती आपला मुलगा नसल्याचा दावा केला होता. त्या व्यक्तीचे केस मोठे आहेत, तर माझा मुलगा छोटे केस ठेवतो, असे त्यांनी म्हटले आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणात सुरुवातीपासूनच अनेक वेगवेगळे दावे समोर येत आहेत. हल्ला नेमका कोणी केला येथपासून ते आता अटक(arrested) करण्यात आलेला संशयित आरोपी खरा आहे का, इथपर्यंत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत.
आता याबाबत पोलिसांकडून काय माहिती दिली जाते, यावर या संपूर्ण प्रकरणाची पुढील दिशा ठरणार आहे. या प्रकरणात शहजादचे बांगलादेशी असणे हा एकमेव ठोस पुरावा आतापर्यंत समोर आला आहे. त्याचे बांगलादेशी ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना सापडले आहे. याशिवाय, सैफच्या घरातील हल्ल्यात त्याचा सहभाग होता, याचा कोणताही ठोस पुरावा पोलिसांनी अद्याप दिलेला नाही.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! PM किसानचा 19 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार?
दुसऱ्या मॅचपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाजाला दुखापत, शमीचं कमबॅक होणार?
अरविंद केजरीवालांना जीवे मारण्याचे रचलं जातयं षडयंत्र