सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन परदेशी महिलांना अटक.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर(airport) सीमाशुल्क विभागाने सोमवारी कारवाई करून दोन परदेशी महिलांकडून ३२ किलो ७९० ग्रॅम सोने जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत १९ कोटी १५ लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. याप्रकरणी दोन्ही महिलांविरोधात सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

अन्झल काला (२७) व साईदा हुसैन (२४) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. दोघीही केनिया देशाच्या रहिवासी आहेत. आरोपी महिलांना त्यांच्याकडील बॅग व अंतर्वस्त्रात सोने लपवले होते. याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीच्या आधारे नौरोबी येथील मुंबई विमानतळावर आलेल्या दोन परदेशी महिलांना सोमवारी ताब्यात घेण्यात आले.

तपासणीत एकीकडे २२ कॅरेट सोन्याचे २८ लगड सापडले, तर दुसऱ्या महिलेकडे ७० सोन्याचे लगड सापडले. अशा प्रकारे दोघींकडून मिळून एकूण ३२ किलो ७९० ग्रॅम सोने सापडले. अंतर्वस्त्रामध्ये तसेच बॅगेमध्ये लपवून आरोपी महिला सोन्याची तस्करीत करत होत्या. याप्रकरणी दोघींनाही अटक करण्यात आली आहे. या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांना मुंबईत हे सोने कोणाला द्यायचे होते? यापूर्वी त्यांनी सोन्याची कस्करी केली होती का? याबाबत सीमाशुल्क विभाग तपास करत आहेत.

हेही वाचा :

लग्नाच्या पाच वर्षांनी आणखी एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याचा संसार मोडला.

भुजबळांचे हे फोटो तुम्ही कधीच पाहिले नसतील ब्लेझर, चष्मा अन् दाढी..

सांगली: चार शतकांचा असणारा वटवृक्ष कोसळला

फक्त एका मुळे भारताने जिंकला सामना, रोहितने मॅचनंतर सांगितलं सिक्रेट