कोल्हापूरमध्ये पूर्ववैमनस्यातून दोघांवर चाकू हल्ला

पूर्वीचा राग मनात धरून ठार मारण्याच्या उद्देशाने एकावर चाकूने हल्ला करण्यात (resident alien)आला. या चाकू हल्ल्यात दोन जण जखमी झाले. राजेश गोसावी व नायक गोसावी रा. विक्रमनगर ,वड्डवाडी कागल अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी विजय सुरेश मकवाने रा.विक्रमनगर गोसावी वसाहत, कागल यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी निलेश सोनुले रा.वड्डवाडी, कागल व संतोष उर्फ बाबू संजय सोनुले रा. सांगाव नाका, कागल यांच्यावर गुन्हा दाखल केला.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, तीन दिवसांपूर्वी संशयित आरोपी निलेश सोनुले व अमोल गोसावी यांच्यामध्ये वाद झाला. त्यावेळी निलेश याने अमोल यास मला निलेश दादा म्हणायचे असे सांगून शिवीगाळ केली होती. त्यानंतर हा वाद नायक गोसावी व गोसावी समाजातील लोकांनी चर्चा करून सोडवला होता. त्याचा राग मनामध्ये धरून 15 डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास इंडियन चौक वड्डवाडी, कागल या ठिकाणी राजेश मनोहर (resident alien)गोसावी व नायक शंकर गोसावी (दोघे रा.विक्रमनगर, गोसावी वसाहत) यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

यातील संशयित आरोपी निलेश व संतोष सोनुले या दोघांनी चाकूसारख्या धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी निलेश (resident alien)सोनुले व संतोष सोनुले या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे करत आहेत.

तर दुसरीकडे, बिर्याणी चांगली बनवली नाही म्हणून सिलिंडरची टाकी डोक्यात घालून सहकारी मित्राची हत्या केली. ही घटना दिघी येथे रविवारी दि.१५ दुपारी घडली. संतोष शंकर खंदारे ४५,  रा.दिघी रोड, मूळ-वाशिम असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. गणेश दिगंबर खंडारे रा. दिघी, मुळ – वाशिम असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खंदारे तीन महिन्यांपूर्वी कामानिमित्त गावावरून दिघी येथे राहण्यास आले होते.

हेही वाचा :

तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे