भरधाव स्कोडा कारची धडक, दोन तरुणींचा अंत; अंगावर काटा आणणारा VIDEO

नवी मुंबई: पाम बीच रोडवर एका वेगवान स्कोडा कारने स्कूटरला जोरदार धडक(crash) दिली. या भीषण अपघातात दोन तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी (१२ जानेवारी) सकाळी कामोठे सेक्टर-१८ येथे राहणारी संस्कृती खोकले (वय २२) आणि कोपरखैरणे येथील बोनकोडे गावात राहणारी तिची मैत्रिण अंजली सुधाकर पांडे (वय १९) अशी या मृत मुलींची नावे असून तुर्भे एमआयडीसीतील रात्रीची शिफ्ट संपवून त्या घरी जात असल्याची माहिती आहे.

तुर्भे येथील बीपीओमध्ये संस्कृती आणि अंजली दोघी काम करायच्या. त्या रात्री ८ ते सकाळी साडे सहा या वेळेत अमेरिकेतील कंपनीसाठी टेलिकॉलर म्हणून काम करत होत्या. संस्कृतीकडे यामाहा फॅसिनो स्कूटर होती. ती रोज कामोठे ते कामाच्या ठिकाणी याच स्कूटीने जायची. सकाळी काम उरकल्यानंतर ती आधी अंजलीला सोडायची, मग घरी जायची.

त्यांच्या शिफ्टनंतर त्या अनेकदा एकत्र जायच्या. संस्कृती ही अंजलीला आधी तिच्या बोनकोडे येथील घरी सोडायची आणि नंतर कामोठे येथील तिच्या घरी जायची. दुचाकी संस्कृतीची होती. त्यांना धडक(crash) देणारा आोरपी कारसह घटनास्थळावरून पळून गेला. आम्हाला दोघींसाठी न्याय हवा आहे आणि आरोपीला लवकर पकडण्यात यावे, असे मृत तरुणींचे सहकारी आणि मित्र तन्मय गढवी यांनी सांगितले.

रविवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास दोघीही ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर त्या घराकडे निघाल्या. संस्कृती कोपरा पुलाजवळील सर्व्हिस रोडने पाम बीच रस्त्यावर आली तिथे वाशीच्या अरंजा सर्कल येथे ठाण्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या स्कोडा कारने त्यांच्या स्कूटरला समोरुन जोरदार धडक दिली.

या अपघातात दोन्ही तरुणी वर हवेत उडाल्या आणि खाली आदळून गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे पोहोचण्यापूर्वीच संस्कृतीचा मृत्यू झाला होता. तर, उपचारादरम्यान अंजलीचाही मृत्यू झाला.

अपघातानंतर स्कोडा कारचा चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. पोलिसांनी स्कोडा चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि कार आणि मालकाचा नोंदणी क्रमांक ओळखण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्कॅन केलं जात आहे, अशी माहिती एपीएमसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय शिंदे यांनी दिली.

हेही वाचा :

नवीन कर प्रणालीमध्ये गृहकर्जात सूट मिळणार? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरवात! जाणून घ्या शाही स्नानाच्या तिथी

श्रद्धा कपूरच्या मोबाईल वॉलपेपरवर हा कोणाचा चेहरा? अखेर ‘बॉयफ्रेंड’वरील प्रेम झालं Reveal