‘छोले’ बनवणं जीवावर बेतलं; गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले, सकाळी झाला मृत्यू

दिल्ली नोएडाच्या सेक्टर ७० मध्ये गंभीर घटना घडली आहे. येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या दोन युवकांचा(youths) घरातच श्वास गुदमरल्यामुळं मृत्यू झाला. शेजाऱ्यांनी घरातून धूर येत असल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात बेशूद्ध अवस्थेत पडलेल्या दोन तरुणांना बाहेर काढलं. दोघांनाही सेक्टर ३९ मधील नोएडा जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

पोलिसांनी दोन्ही तरुणांची(youths) उत्तरीय तपासणी करण्यासाठी मृतदेह पाठवला आहे. उपेंद्र (२२) आणि शिवम (२३) अशी मृत तरुणांची नावे आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही नोएडामध्ये छोले-कुलचे आणि भटुरे विक्रीचा स्टॉल लावत होते. येथेच ते एका भाड्याच्या घरात हे पदार्थ बनवण्याचं काम करायचे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनी रात्री गॅसवर पातेल्यात छोले शिजवण्यासाठी ठेवलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांना झोप लागली. रात्रभर गॅस सुरू राहिल्यामुळं छोले पातेल्यातच जळाले आणि त्यातून घरात धूर पसरला.

सकाळी शेजाऱ्यांना घरातून धूर निघत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला. पोलिसांच्या मदतीने तरुणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. श्वास कोंडल्यामुळं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे.

पोलिसांनी सांगितलं की, घराच्या खिडक्या, दरवाजे बंद असल्यामुळे धूर बाहेर पडला नाही. त्यातच घरात ऑक्सिजनची कमतरता आणि कार्बन मोनोऑक्साइडची मात्रा वाढल्यामुळे तरुणांचा श्वास कोंडला. तरुणांच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. मात्र, तरीही मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळू शकेल, असेही पोलिसांनी सांगितलं.

हेही वाचा :

मोठी बातमी! वाल्मिक कराडला दणका, शस्त्र परवाना केला रद्द

महिला सन्मानसह विविध योजनांमुळे एसटी झाली ‘मालामाल’

हा माज येतो कुठून! तरुणाकडून पोलिसाला मारहाण, Video Viral