उद्धव ठाकरेच मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले(political) आहेत. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी गाठीभेटी घेतल्या आहेत. आता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असणार का? या चर्चांना उधाण आले आहे.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या(political) प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि रणनीतीबाबत चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. तर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांची देखील घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय की, महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुतीचा पराभव करणे हाच प्रमुख उद्देश आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय कधीही घेता येईल. मुख्यमंत्री असताना मी चांगले काम केले असेन तर महाविकास आघाडीतील माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसंदर्भात निर्णय घ्यावा, असे त्यांनी म्हटल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटीनंतर तेच महाविकास आघाडीचा चेहरा असणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा असणार का? अशी चर्चा रंगलेली असताना आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे हे पहिले आम्हाला चिडवायचे की, तुम्हाला दिल्ली दरबारी जाऊन निर्णय करावे लागतात. आज त्यांच्यावर देखील हीच परिस्थिती आली आहे. तीन दिवस दिल्लीत जावे लागले आहे. अपॉइंटमेंट घेऊन मुख्यमंत्रिपदासाठी याचना करावी लागते. तरी इतर दोन मित्र हे सांगायला तयार नाही की तेच मुख्यमंत्री असतील. मला त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटते, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

हेही वाचा:

विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा: “माँ कुश्ती मेरे से जीत गई, मैं हार गई”

वजन वाढवण्याची भीती न करता पांढरे लोणी खा: याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

‘धर्मवीर-२’च्या प्रदर्शनाची तारीख बदलली: पावसामुळे लांबणीवर आणि राजकीय चर्चेचा उदय