उद्धव ठाकरेंचा भाजपला जोर का झटका; बडा नेता बांधणार शिवबंधन
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी(political news) मतदानाला अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. असं असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या बड्या नेत्याने नुकतीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली आहे. लवकरच ते उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.
वंचित बहुजन आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष पवन पवार आणि भाजप(political news) कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे हे दोन नेते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. येत्या 15 नोव्हेंबर रोजी नाशिकच्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या सभेत दोघांचाही पक्षप्रवेश पार पडणार आहे.
मविआचे नाशिक पश्चिम मतदारसंघातील उमेदवार सुधाकर बडगुजर व नाशिक मध्य मतदारसंघातील वसंत गिते यांच्या प्रचारार्थ संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी पवन पवार व विक्रम नागरे यांनी त्यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते ठाकरे गटात जाणार आहे. त्यामुळे वंचितसह भाजपलाही हा मोठा धक्का बसलाय.
आमची नाराजी दूर होत नसल्यामुळे आम्ही भाजप सोडण्याचा निर्णय घेतल्याचे नागरे यांनी म्हटलंय. विक्रम नागरे यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिक पश्चिम मतदारसंघातील उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ताकद ही आता वाढणार आहे. तर, वंचितमधून निलंबित करण्यात आलेले पवन पवार देखील शिवबंधन बांधणार आहेत.
पवन पवार यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले असून, पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पवन पवार यांना वंचित बहुजन आघाडीने तीन वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. आता ते उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
हेही वाचा :
आनंदाची बातमी! सोनं आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण
ऐन विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
“त्याने मला शारीरिक दुखापत केली…”, अखेर ऐश्वर्या राय स्पष्टच बोलली