पुतळे नाही तर प्रत्येक जिल्ह्यात मंदिरं उभारणार; उद्धव ठाकरेंची कोल्हापुरात तुफान फटकेबाजी
राज्यात येत्या २० दिवसांत महाविकास आघाडीचं स्थिर सरकार येणार आहे, शिवाय अन्नधान्याचे भावही स्थिर ठेवणार आहे. तसंच महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ८ महिन्यात कोसळला. मात्र आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर पुतळे नाही तर प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचं मंदिर उभारणार, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आज दिलं. ते कोल्हापुरातील राधानगरीत प्रचार सभेत बोलत होते. यावेळी कॉंंग्रेसचे नेते सतेज पाटील, खासदार शाहू महाराज उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघातून ठाकरे गटाचे के.पी. पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांच्या प्रचारासाठी आज आदमापूर इथं सभेचं आयोजन करण्यात आले होतं. या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी, खोके सरकारला भस्म करण्याचा क्षण आता आला आहे थेट महायुती सरकारवर हल्लाबोल केला. यासोबत लाडकी बहीण योजना, महागाई यावरून सरकारवर निशाणा साधला.
लोकांच्या मनात एक राग आहे. हा राग गेली अडीच वर्षे मनात धगधगत ठेवला होता. आता खोते सरकारला भस्म करण्याचा क्षण आला आहे. कोल्हापुरातील विजयाची जबाबदारी आता सतेज पाटील यांच्याकडे देते आहे. मी स्वत:साठी लढत नाही तर महाराष्ट्रासाठी लढतत आहे. जे गेले त्यांच्यासोबत जाऊ शकलो असतो. त्यांना ५० खोके दिले. मात्र मी जर अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर गोदाम कमी पडलं असतं. पण गद्दारी माझ्या रक्तात नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अलिकडेच न्याय देवेतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली. त्या न्यायदेवतेला आपल्या देशातील लोकशाही संपत चाललेय हे कळत नाही. सर्व समाज आज तोडून फोडून टाकले आहेत. संपूर्ण राज्य अदानींना विकलाय. इथलं पाणी अदाणींना विकलं असं जेव्हा सांगितलं तेव्हा धक्का बसला. चंद्रपूरची शाळा अदानीला दिली जाते. संपूर्ण महाराष्ट्र जणू अदानीला फुकट दिला जात आहे, विकला जात आहे. जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष महाराष्ट्राला विकण्यासाठी मदत करतोय तो मराहाराष्ट्राचा शत्रू असल्याचं उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं
काही दिवसात महाविकास आघाडीचं सरकार निवडून आणणार म्हणजे आणणारच. तसंच शिवाजी महाराजांचा उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. मात्र महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचं मंदिर उभारणार, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. आमचं दैवत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीला मशालगीत होतं. तुमच्याकडे वाजलं नसेल, कारण शाहू महाराज स्वतः उमेदवार होते. तुम्ही माझ्यावर कारवाई करून तर बघा, महाराष्ट्र तुमच्यावर कारवाई करेल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला आहे.
हेही वाचा :
गुड न्यूज! दिवाळी सरताच सोनं झालं स्वस्त
भाजपला मोठा धक्का ! राष्ट्रीय प्रवक्त्यानेच दिला राजीनामा
टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने केली निवृत्तीची घोषणा