कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
पवार कुटुंबीयांच्या हातामध्ये काही नामवंत संस्थांची सत्ता सूत्रे आहेत. या संस्थांच्या नैमित्तिक बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि अजितदादा पवार हे एकत्र येत असतात. (together)अगदी शेजारी शेजारी बसून बैठकीचे कामकाज पाहतात. आणि मग हे काका पुतणे राजकीय मंचावर पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा सुरू होतात किंवा मीडियाकडून घडवून आणल्या जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट केव्हाही एकत्र येणार नाहीत हे खासदार सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकले आहे.राज्यातील महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणार असे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न काही जणांच्या कडून सुरू आहे. आमदार रोहित पवार यांनी एकत्रिकरणा बद्दल खासदार सुप्रिया सुळे या निर्णय घेऊ शकतात असे अनेकदा सांगून शरद पवार आणि अजितदादा हे एकत्र येऊ शकतात असे सुचित केले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यावरून काका पुतणे हे एकत्र येणार नाहीत हे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवताना स्थानिक पातळीवर काही निर्णय घेण्याचे स्थानिक पदाधिकाऱ्यांना स्वातंत्र्य आहे मात्र भारतीय जनता पक्षाबरोबर युती करायची नाही हा आम्ही घेतलेला निर्णय आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे.
अजितदादा पवार हे भारतीय जनता पक्षा सोबत राज्याच्या सत्तेत आहेत. (together)त्यामुळे अजितदादा गटाशी शरद पवार गटाने हात मिळवणी करणे म्हणजे एका अर्थाने भाजप बरोबर जाणे होय. आणि प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे भाजपच्या जवळ जायचे नाही असा पक्षाने निर्णय घेतला असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येणे अशक्य असल्याचे खासदार सुळे यांना म्हणावयाचे आहे.
काही दिवसापूर्वी इंडिया आघाडीची नवी दिल्लीत बैठक होती. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर संसदेचे खास अधिवेशन बोलवण्यात यावे अशी मागणी या बैठकीत करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण शरद पवार यांनाही होते. मात्र पवार हे या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. याच दरम्यान खासदार सुप्रिया सुळे या भारताच्या वतीने भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी म्हणून शिष्टमंडळासोबत परदेश दौऱ्यावर गेले होत्या. सुप्रिया सुळे यांचा शिष्टमंडळात झालेला समावेश आणि इंडिया आघाडीच्या बैठकीकडे शरद पवार यांनी फिरवलेली पाठ या दोन घटनांचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याशी लावण्यात आला होता. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्ही भाजपशी युती करणार नाही अशी स्वच्छ भूमिका जाहीर केली आहे. एकूणच हे दोन्ही गट एकत्र येणार अशा चर्चा होतात तथापि प्रत्यक्षात काहीच होत नाही.
आता तर भाजपाशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष युती केली जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे
हे दोन्हीही गट आप आपल्या जागीच राहणार आहेत.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्व काही अलबेल आहे असे नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 व्या वर्धापन दिनात बोलताना बोलताना जयंत पाटील यांनी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून आता मला मुक्त करा अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केल्यामुळे, जयंत पाटील विरोधात शरद पवार गटात एक गट सक्रिय असल्याचे पुढे आले आहे. (together)जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून दूर करा अशी मागणी एका गटाची आहे. या गटाला रोहित पवार यांचे समर्थन आहे. त्याचबरोबर एका गटाला जयंत पाटील यांना सत्तेत जावे असे वाटते आहे तर खासदारांची भूमिका नेमकी उलटी आहे. हीच भूमिका सुप्रिया सुळे बोलून दाखवताना दिसतात.तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित दादा या दोन्ही गटाकडून पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. दोन्ही ठिकाणी एकत्रिकरणया विषयावर चर्चा झाली नाही. कार्यकर्त्यांचे प्रबोधन किती झाले हे समजण्यास मार्ग नाही मात्र कार्यक्रम संपल्यानंतर माघारी वळणारा कार्यकर्ता स्वतःलाच प्रश्न विचारत होता की, दोन गटांचे मनोमिलन होणार की नाही?
हेही वाचा :