कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदाची आज निवड होणार आहे. पण गोकुळच्या राजकारणात|(politics) मात्र वेगळ्याच हालचालींना सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एंट्री झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपाने महायुतीचाच अध्यक्ष व्हावा यासाठी नेत्यांवर दबाव आणला जात असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल (२९ मे) महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये गोकुळच्या अध्यक्षपदासाठी अडीच तास खलबतं झाली. या बैठकीबाबत कोणतीही माहिती पुढे आली नसली तरी, आज संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये धक्कादायक नाव समोर येऊ शकते. महायुतीचाच अध्यक्ष करण्यासाठी अजित नरकेस नाविद मुश्रीफ, अमरीशसिंह घाटगे, अमर पाटील या नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. गोकुळच्या अध्यक्षपदासाठी यापूर्वी अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील-चुयेकर यांची नावे समोर आली होती. पण देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीचाच अध्यक्ष करण्याच्या सुचना दिल्याची माहिती आहे.
दरम्यान, महायुतीचाच अध्यक्ष होण्यासाठी गोकुळचे अध्यक्ष अरूण डेंगळे यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ केली होती. पण तीन दिवसांतच त्यांचे बंड शांत झाले. त्यानंतर गोकुळचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत आनंदराव पाटील-चुयेकर यांचे पुत्र शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात होते. आज होणाऱ्या संचालक मंडळाच्या मिटींगमध्ये त्यांच्या नावाची घोषणाही केली जाणार होती.पण काल अचानक महायुतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी थेट फडणवीस यांनीच हस्तक्षेप केल्यामुळे गोकुळच्या राजकीय(politics) वर्तुळात पडद्यामागे घडामोडींना वेग आला आहे.
शशिकांत पाटील-चुयेक हे काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्यासोबत आहेत. ते जर अध्यक्ष झाले तर गोकुळवर काँग्रेसचा आणि पर्यायाने सतेज पाटील यांचा समर्थक अध्यक्षपदी विराजमान होईल. त्यामुळे महायुतीचाच अध्यक्ष करा, मग तो कुणीही असला तरी चालेल, अशा सुचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे बोलले जात आहे. जिल्हा बँकेत यासंदर्भात झालेल्या बैठकीतही नेत्यांच्या देहबोलीतून काही तरी नवे समीकरण तयार होत असल्याचे संकेत मिळाले. त्यामुळेच याआधी अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले चुयेकर यांचे नाव मागे पडल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अंबरिशसिंह घाटगे प्रबळ दावेदार?
दरम्यान, गोकुळच्या अध्यक्षपदासाठी महायुतीकडून अंबरिशसिंह घाटगे यांचे नाव सध्या पुढे येत आहे. अंबरिशसिंह घाटगे सध्या भाजपसोबत असले तरी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहेत. विशेष म्हणजे तेते विरोधी पॅनेलमधून विजयी झाल्यामुळे त्यांच्या नावाला गोकुळच्या अंतर्गत समीकरणांमध्ये त्यांना किती पाठिंबा मिळतो, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
याशिवाय, महायुतीचे आमदार डॉ. विनय कोरे यांनी अमर यशवंत पाटील यांच्या नावाचाही जोरदार पाठपुरावा केला आहे. मात्र, या नावावर सर्व नेत्यांचे एकमत होणे कठीण असल्याचे दिसते. घाटगे अध्यक्ष झाले, तर त्यांना नाविद मुश्रीफ यांचाही विरोध होणार नसल्याची शक्यता आहे, कारण स्थानिक राजकारणात(politics) घाटगे आणि मुश्रीफ यांचे संबंध सौहार्दाचे आहेत. यामुळेच घाटगे हे सर्वसाधारण सहमतीचे नाव ठरू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
सेनेचा अध्यक्ष करण्याच्या हालचाली
काल झालेल्या बैठकीत महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये अजित नरके, नाविद मुश्रीफ आणि अंबरिशसिंह घाटगे या तिघांच्या नावांवर चर्चा झाली. यापैकी एका नावावर आजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, शिवसेनेचाच अध्यक्ष करावा, अशी जोरदार मागणी काही नेत्यांकडून पुढे आली आहे. त्यामुळेच शिवसेनेचे अजित नरके हेही अध्यक्षपदासाठी आघाडीच्या स्पर्धेत असल्याचे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा :