मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू: शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा सवाल

सोलापूर: शेतात काम करत असताना मधमाशांच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू (death)झाल्याची दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. मृत शेतकऱ्याचं नाव गणपती भोसले (वय ५५) असं असून, ते आपल्या शेतात काम करत असताना अचानक मधमाशांनी हल्ला केला.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील झाडांवर मधमाशांचे पोळे होते, आणि त्यात काहीतरी हलचल झाल्याने मधमाशांनी भोसले यांच्यावर हल्ला केला. जोरदार डंखांमुळे ते बेशुद्ध पडले, आणि त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रशासनाने या घटनेचा तपास सुरू केला असून, शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा :

आपली नावं मोठी आहेत, त्यामुळे आपला वापर झालाय” – निक्की तांबोळीचं अभिजीतसोबतचं विधान, नेटकऱ्यांकडून ट्रोलिंगचा सामना

यूपीआय, ॲप किंवा एटीएम कार्ड नसतानाही ५० हजारांची फसवणूक: बँक खात्यातून रक्कम लंपास

शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० विद्यार्थ्यांवर उपचार सुरू