हिवाळ्यात अवकाळी पावसाचे संकट महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार बरसात

 फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातून थंडी गायब झाली आहे. (rains)ऐन हिवाळ्यात राज्यातील अनेक भागात सध्या धो-धो पाऊस बरसत आहे. या डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच हवामानात मोठे बदल दिसून येत आहेत.  मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे नागरिकांना हिवाळ्यात अवकाळी संकटाचा सामना करावा लागतोय. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर मध्ये आज 6 डिसेंबर सकाळपासूनच जोरदार पावसाने हजारी लावली आहे. याशिवाय परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात देखील सध्या पावसाच्या सरी बरसत आहेत. या जिल्ह्यातील किमान तापमानात देखील वाढ झाली असून आज ते 21 अंश राहण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,  पुणे , कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सध्या फेंगल चक्रीवादळाचा धोका कमी झाला असला तरी त्याचे परिणाम हे संपूर्ण महाराष्ट्रावर दिसून येत आहेत. त्यामुळे थंडीसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील तीन ते चार दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान(rains) विभागाने व्यक्त केलाय. हिवाळ्यात बरसणाऱ्या पावसामुळे रब्बी पिकांचे देखील अतोनात नुकसान झाले आहे. पुढील काही दिवस आणखी पाऊस बरसणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता ही आणखीच वाढली आहे. कोकणात देखील सध्या जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील 3 दिवस काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.

पावसामुळे आरोग्याच्या समस्या देखील समोर येत आहेत. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय. येत्या काही दिवसांत (rains)देशभरात तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.  पुढील 24 तासांत आंध्र प्रदेश, केरळ आणि कर्नाटकात हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तामिळनाडू, तेलंगणा, मध्य महाराष्ट्र आणि गोव्यात हलक्या पावसाची शक्यता आहे. ओडिशा, सिक्कीम, आसाम आणि अरुणाचल प्रदेशातही हलका पाऊस पडू शकतो.

हेही वाचा :

शिवसेनासह राष्ट्रवादीच्या निमंत्रण पत्रिकेतही एकनाथ शिंदेंचं नाव नाही!

‘माझ्या मुलाला सोडा’; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये

इतिहासाची अशीही पुनरावृत्ती! तेव्हा ठाकरे, आता शिंदे; पक्षप्रमुखांसमोर पेच, कारण तेच

‘मी धोनीशी बोलत नाही, 10 वर्ष झाली…’ हरभजन सिंहचं MS Dhoni बाबत खळबळजनक वक्तव्य

इतिहासाची अशीही पुनरावृत्ती! तेव्हा ठाकरे, आता शिंदे; पक्षप्रमुखांसमोर पेच, कारण तेच