उर्वशी रौतेला करणार ऑरीशी लग्न? चाहते म्हणाले ‘पुरुषाशी लग्न करणारी पहिली भारतीय स्त्री’

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या ‘डाकू महाराज’ या चित्रपटामुळे(Entertainment news) चर्चेत आहे. या सगळ्यात ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच चर्चेत येण्याचं कारण हा सोशल मीडिया सेन्सेशन ओरहान अवतरमणी आहे, ओरहान अवतरमणी उर्फ ऑरी. त्या दोघांच्या सोशल मीडियावरील चर्चेमुळे एका वेगळ्याच गोष्टीला फाटा फुटला आहे. सोशल मीडियावर त्या दोघांनी जी कमेंट केली त्यावरून ते दोघं लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

आता बॉलिवूडचा(Entertainment news) ‘बीएफएफ’ असलेल्या ऑरीसोबत केलेल्या चर्चेमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. ऑरीनं नुकतेच आदर जैन आणि आलेखा आडवाणी यांच्या लग्नातील फोटो शेअर केले. त्यात त्यानं लाल रंगाचा कुर्ता, मॅचिंग नेहरू जॅकेट परिधान केलं होतं. ज्या गोष्टीनं सगळ्यांच जास्त लक्ष वेधलं, ते आहे कमेंट सेक्शन. उर्वशी रौतेलानं या फोटोवर कमेंट करत लिहिलं की ‘तुझ्या लग्नात येण्यासाठी खूप उत्साही आहे.’ त्यावर उत्तर देत ऑरीनं मस्करीत म्हटलं की ‘आपल्या’.

नेटकऱ्यांचं लक्ष हे उर्वशी रौतेला आणि ऑरीमध्ये असलेल्या चर्चेनं वेधलं आहे. रेडिटवर त्याची चर्चा सुरु झाली. त्याचा एक स्क्रीनशॉट हा चांगलाच व्हायरल होतोय. त्यामुळे ऑनलाइन सगळीकडे याची चर्चा सुरु आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘कोणत्या पुरुषाशी लग्न करणारी पहिली भारतीय स्त्री.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘ऑरीशी लग्न करणारी पहिली भारतीय महिला.’ तिसरा नेटकरी म्हणाला, ‘हे त्यांचं जग आहे. आपण फक्त त्यांच्यात राहतोय.’

16 फेब्रुवारी 2025 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये इन्स्टाग्रामवर ‘डाकू महाराज’ चं पोस्टर प्रदर्शित झालं. त्यात प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली. पण नेटकऱ्यांची एक गोष्ट लक्षात आली ती म्हणाले त्यात बालकृष्ण, बॉबी देओल, प्रज्ञा जायसवाल आणि श्रद्धा श्रीनाथ. तर उर्वशी रौतेला तिथे दिसलीच नाही. पण त्यानंतर त्याचा पोस्टर देखील समोर आला आहे.

हेही वाचा :

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी!

‘उद्धव ठाकरे हा तर टक्कापुरुष’; ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंवर टीका

“अंतर्वस्त्राचे पैसेही…”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका