वाल्मिक कराडला लागोपाठ दुसरा मोठा धक्का, कोर्टाने घेतला मोठा निर्णय

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आला आहे. तसेच वाल्मिक कराडच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. अशातच आता वाल्मिक कराडला पुन्हा एकदा दुसरा धक्का बसला आहे. कारण आता केज कोर्टाने (court)वाल्मिक कराड याचा एसआयटीकडे ताबा देण्याची मागणी मान्य केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, आज मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्या कोठडीबाबत केज कोर्टात(court) सुनावणी पार पडली. यावेळी वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली तरी देखील एसआयटीने देशमुख हत्येच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडचा ताबा मिळावा अशी मागणी केज न्यायालयात केली होती.

सर्वात विशेष बाब म्हणजे कलम 302 प्रकरणात वाल्मिक कराडवर मोक्का दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर केज न्यायालयाने वाल्मिक कराडचा SIT कडे ताबा देण्याची मागणी देखील आता मान्य केली आहे. त्यामुळे वाल्मिक कराडसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्येच्या गुन्ह्यात सीआयडीने वाल्मिक कराडवर प्रोडक्शन वॉरंट जारी केलं होत, मात्र आता कोर्टाने ते मंजूर केलं आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडचा ताबा सीआयडीकडे गेला आहे.

परंतु,आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी उद्या (15 जानेवारी) वाल्मिक कराडला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे. तसेच त्याच्या पोलीस कोठडीबाबत पुन्हा एकदा युक्तिवाद केला जाणार आहे.

हेही वाचा :

“हो, पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट माझ्यासाठी…”, करीना कपूरच्या ‘त्या’ वक्तव्याने हादरलं होतं बॉलिवूड

लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा मिळणार नाही पीएम किसान योजनेचा 2000 रूपयांचा19 वा हफ्ता

देशातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सरकार EPFO मधील किमान पेन्शन वाढवण्याच्या तयारीत?