बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी मंडळाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थी(students) 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करू शकतात. तर, 15 नोव्हेंबर ते 22 नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेत.
यावर्षी बोर्डाच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत 8 ते 10 दिवस अगोदरच सुरू होणार आहेत. या परीक्षांच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. बारावीची परीक्षा ही 11 फेब्रुवारीपासून तर दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.
राज्य मंडळाच्या वतीने पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सुरू होईल.
तर, दहावीची परीक्षा ही मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते. या परीक्षेनंतर बारावीचे निकाल हे जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जातात. त्यानंतर अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी(students) जुलै-ऑगस्टची पुरवणी परीक्षा जुलैच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेण्यात येते.
दहावी-बारावी परीक्षेच्या नियोजित तारखा
बारावी परीक्षा : 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 या कालावधीत होण्याची शक्यता आहे.
दहावी परीक्षा : 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025
हेही वाचा :
“हा एक कठीण काळ…”, सई ताम्हणकरचं अनिश जोगसोबत ब्रेकअप
ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाने भाजपच्या शहर प्रमुखाच्या श्रीमुखात भडकावली…
वयाच्या २६व्या वर्षी ७४ कोटींची मालकीण: ‘ही’ अभिनेत्री आलिशान बंगला आणि लक्झरी कारची मालकीण!