VIDEO : ‘बाप बाहेर आलाय…’ येरवड्यातून सुटल्यावर भाईची जंगी रॅली
पुण्यामध्ये एक भाई जेलमधून बाहेर आला अन् त्यानं मोठं सेलीब्रेशन केलं. जेलमधून बाहेर आल्यावर त्याने मोठी रॅली काढल्याचा एक व्हिडिओ (video)समोर आलाय. पण या भाईला ही रॅली काढणं महागात पडलंय.
त्याला पोलिसांच्या दणक्याला सामोरं जावं लागलंय. पोलिसांनी त्याच्यावर वाहनांची तोडफोड आणि दहशत निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचं समोर आलंय. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.
पुण्यातील प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे नावाचा व्यक्ती मोक्काप्रकरणी जेलमध्ये होता. त्यानंतर त्याने जेलमधून बाहेर आल्यानंतर 50-60 समर्थकांसह येरवडा बाजार परिसरामध्ये आलिशान कारमधून मोठी रॅली काढली. या रॅलीचा (video)व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहे.
नागरिकांना रॅलीमधील तरूणांनी धमकावलं होतं. यावेळी त्यांनी बाप बाहेर आलाय, बॉस बाहेर आलाय असं म्हणत काल संध्याकाळी रॅलीमधील युवकांनी नागरिकांना शिवीगाळ केली होती.
या घटनेशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. कॉन्स्टेबल लहू गडमवाड यांच्या तक्रारीवरून येरवडा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. रॅलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगात फिरतोय.
गुंडाने जेलमधून बाहेर आल्यानंतर दहशत पसरवण्याचा प्रयत्न केलाय. तसेच नागरिकांना धमकावल्याचं देखील समोर आलंय. अगोदरच पुणे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आहे, त्यादरम्यानच हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
मोक्का मध्ये येरवडा जेलमध्ये असलेला प्रफुल उर्फ गुड्या गणेश कसबे हा जेलमधून बाहेर आला. त्यानंतर त्याने आणि त्याच्या सुमारे ५०-६० समर्थकांनी येरवडा बाजार परिसरात आलिशान कारमधून रॅली काढली.#punenews #Pune #prafulkasbe #viralvideo #म pic.twitter.com/HvphYridh8
— Harish Malusare (@harish_malusare) January 10, 2025
बाप बाहेर आलाय म्हणत येरवडातून सुटल्यावर भाईने जंगी रॅली काढली. पोलिसांनी तिथूनच धिंड काढल्याची घटना पुण्यात घडली. पुण्यातील गुन्हेगार प्रफुल उर्फ गुड्या कसबे याने जेलमधून बाहेर आल्यावर मोठी रॅली काढली.
परिसरातील नागरिकांना धमकावलं म्हणून येरवडा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. तसेच नऊ आरोपींना अटक देखील केली आहे. पोलिसांच्या दणक्यानंतर पुण्यात गुंडांना आळा बसेल का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
भारतीय वंशाचे चंद्र आर्य होणार कॅनडाचे नवे पंतप्रधान?
कोल्हापूर ते मुंबई प्रवास आता फक्त 45 मिनिटांत; ‘स्टार एअर’ देणार विमानसेवा
कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांनो भारतीय रेल्वेकडून महाकुंभ स्पेशल टूर पॅकेज