‘अंखियों से गोली मारे’ वर गोविंदाचा मुलाचा आणि रवीनाच्या लेकीचा VIDEO

काही कलाकार आहेत त्यांची जोडी ही चित्रपटप्रेमींच्या मनात घर करून जाते. ते दोघे एकत्र येणार असं कळलं तरी प्रेक्षकांना आनंद होतो. इतकंच नाही सतत एकत्र काम केल्यामुळे त्यांच्यात चांगली मैत्री देखील होते. अनेक कलाकार तर बेस्ट फ्रेंड्स होतात(VIDEO). असंच एक इंडस्ट्रीतील उदाहरण द्यायचं झालं तर अभिनेता गोविंदा आणि अभिनेत्री रवीना टंडन यांची मैत्री.

ते फक्त एकमेकांचे सहकलाकार नाही तर ते लहानपणापासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे अर्थातच त्यांच्यासोबत त्यांच्या मुलांमध्ये देखील तशीच मैत्री आहे. नुकताच रवीनाची लेक राशा थडानी आणि गोविंदाचा मुलगा यशवर्धनचा एक व्हिडीओ(VIDEO) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात ते दोघं नाचताना दिसत आहेत.

राशा थडानीनं यशवर्धनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा व्हिडीओ शेअर केला आहे. राशानं इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सेल्फी आणि पार्टीमध्ये दोघांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. राशानं ही पोस्ट शेअर करत यशवर्धनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या मजेशीर क्लिपमध्ये यशवर्धन हुडी परिधान केली आहे आणि राशानं शर्ट परिधान केलं आहे. या सगळ्या पेक्षा जास्त लक्ष नेटकऱ्यांचं त्यांच्या त्या व्हिडीओनं वेधलं आहे. या व्हिडीओत(VIDEO) असं खास काय आहे याचा विचार तुम्ही ही करत असाल तर या व्हिडीओत राशा आणि यशवर्धन हे दोघे 2002 मध्ये गोविंदा आणि रवीनाच्या प्रदर्शित झालेल्या ‘अंखियों से गोली मारे’ या गाण्यावर डान्स करताना दिसले.

‘अंखियों से गोली मारे’ हे गाणं रवीना आणि गोविंदाच्या लोकप्रिय ठरलेल्या गाण्यांपैकी एक आहे. त्यांच्या याच हिट गाण्यावर त्या दोघांच्या मुलांना डान्स करताना पाहून अनेकांना आनंद झाला आहे. यशवर्धन आणि राशा हे दोघे देखील व्हिडीओमध्ये चांगले दिसत आहेत.

त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट करत त्यांची स्तुती करत आहेत. अनेकांनी म्हटलं की या गाण्यावर डान्स करून त्यांनी या गाण्याला जस्टिफाय केलं आहे. दुसरा नेटकरी म्हणाला, त्या दोघांना पुन्हा एकदा एकत्र आणा. तिसरा नेटकरी म्हणाला, या दोघांना एकत्र पाहून मज्जा आली.

राशाविषयी बोलायचं झालं तर तिनं अजय देवगनच्या ‘आजाद’ या चित्रपटातून डेब्यू केला आहे. एक अभिनेत्री म्हणून तिच्या करिअरची सुरुवात झाली आहे. तर आता व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे आता अनेकांना राशा आणि यशवर्धनला एकत्र पाहायचं आहे. त्यांनी ती इच्छा व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

मी कायम चुकीच्या पुरुषांवर 12 अफेअर्सनंतर बड्या अभिनेत्रीचा मोठा खुलासा

टोमॅटो फ्रीजमध्ये का ठेवू नयेत ते साठवण्याचा योग्य मार्ग कोणता जाणून घ्या हे सोपे हॅक

तर आपण भीकेला लागू वाल्मिक कराडचा तो खळबळजनक फोन कॉल उघड