माशासाठी बगळा घारमध्ये थरारक लढत व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

जंगली प्राण्यांमधील हाणामाऱ्या नेहमीच सोशल मीडियावर शेअर केल्या जातात.(people) प्राण्यांच्या जीवनाशी निगडित असे हे व्हिडिओज पाहायला लोकांना फार आवडते, यातून त्यांचे जीवन आणखीन जवळून पाहता आणि समजता येते. प्राण्यांचे जीवन हे संघर्षाने भरलेले असते, आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांना त्यांना एकमेकांची शिकार करून जीवन जगावे लागते. अशात काही शिकारी प्राण्यांच्या थरारक शिकारीचे अथवा लढतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले जातात. वाघ, सिंह, बिबट्या, मगरी यांच्या खतरनाक शिकारीच्या व्हिडिओजचा समावेश असतो.

सध्या अवकाशातील शिकाऱ्यांच्या थरारक लढतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यात एक बगळा आणि घार भर अवकाशात एका माशांसाठी एकमेकांना लढत देत असल्याचे दिसून येत आहे. हे दोघेही अनुभवी आणि खतरनाक शिकारी आहेत अशात दोघांमधील या युद्धात नक्की कोण कोणावर भारी पडतं? आणि कोणाचा यात विजय होतो? हे पाहणे फार मजेदार ठरते.

घारीची नजर ही फार तीक्ष्ण असते, ती बऱ्याचदा अचूक हल्ला करते. दुसरीकडे बगळा देखील यात काही कमी नाही, तो संयमाने अचूक वेळ साधतो आणि आपल्या शिकाऱ्याला मृत्यूच्या घाटात पाडतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत या दोन्ही शिकाऱ्यांमधील एका माशासाठी रंगलेली एक थरारक (people)लढत दिसून येत आहे. यात सुरुवातीला निळ्याशार अवकाशात घार घार आपल्या एका पायात मासा घेऊन उडत असल्याचे दिसते. तितक्यात मागून बगळा हवेला चिरत वेगात येतो आणि थेट घारीच्या पायातील मासा आपल्या तोंडात पकडून खाली उतरतो. घारीला काही समजेल तेवढ्यात बगळा आपली ही शिकार फस्त करून टाकतो. अखेर घार आणि बगळ्यातील या लढतीत बगळा विजयी ठरतो आणि घारीला आपली हार पत्करावी लागते.

पक्ष्यांच्या लढतीचा हा व्हिडिओ  नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला 5 लाखाहून अधिक लोकांनी लाइक्स दिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत या लढतीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तो मासा हवा वाटतोय” (people)तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “निसर्ग खूप क्रूर आहे पण सुंदर आहे”.हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

हेही वाचा :

तरच 2100 रुपये मिळणार?’; लाडक्या बहीणींनो ‘या’ 6 गोष्टी लगेच चेक करा

मनोज जरांगे नव्या वर्षात करणार धमाका?, केली मोठी घोषणा

थंडीत पाठदुखी वाढते? औषधांऐवजी ‘या’ नैसर्गिक उपायांनी करा वेगाने बरे