Video ओरडली किंचाळत राहिली मदतीला कोणीही नाही महिलेवर हल्ला
तब्बल १५ कुत्र्यांनी एकत्र येत एका महिलेवर हल्ला केला (help)आहे. ही महिला पहाटे ६ च्या सुमारास आपल्या सोसायटीखाली पार्किंग परिसरात मॉर्निंग वॉकसाठी आली होती.शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर मोठ्याप्रमाणात वाढला आहे. रहदारी नसेल शांतता असेल तेव्हा भटके कुत्रे अचानक एखाद्या व्यक्तीवर हल्ला करतात. अशा घटनांमध्ये आजवर अनेक व्यक्ती जखमी झाल्यात तर काहींचा जीव सुद्धा गेला आहे. अशात ४ दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली आहे. या घटनेत महिलेवर कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला आहे. घटनेचा व्हिडिओ देखील आता व्हायरल होत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हैदराबादच्या मणिकोंडामधील चित्रपुरी हिल्स परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेत तब्बल १५ कुत्र्यांनी एकत्र येत एका महिलेवर हल्ला केला आहे. ही महिला पहाटे ६ च्या सुमारास आपल्या सोसायटीखाली मॉर्निंग वॉकसाठी आली होती. नेहमीप्रमाणे ती चालू लागली, त्यावेळी ३ ते ४ कुत्रे आधी तिच्याजवळ आले. त्यानंतर बघता बघता अचानक १५ कुत्र्यांनी या महिलेला घेरलं.
कुत्रे तिच्यावर भुंकू लागले आणि तिला चावण्याचा प्रयत्न करू(help) लागले. सकाळची वेळ असल्याने बाहेर कोणीही नव्हते. आपला जीव वाचवण्यासाठी महिला जोरजोरात ओरडू लागली, किंचाळू लागली, मात्र तिचा आवाज लगेचच कुणापर्यंत पोहचला नाही. या परिस्थितीत महिलेने हार मानली नाही. तिने हाताने आणि आजुबाजूला असलेल्या वस्तूंचा वापर करत कुत्र्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला.
मात्र कुत्रे काही तेथून जात नव्हते. शेवटी काही कुत्रे तिला चावण्यासाठी पुढे येऊ लागले. त्यावेळी महिलेने या कुत्र्यांना मारण्यासाठी पायतून चप्पल काढली. चप्पल काढल्याचं पाहताच कुत्रे तिच्यापासून दूर पळाले. त्यानंतर ही महिला पुढे चालू लागली तेव्हा ती पाय घसरून पडली. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तितक्यात एक व्यक्ती तेथे स्कुटीवरून येत होता. त्याने महिलेला वाचवण्यासाठी तिच्या दिशेने धाव घेतली.
या भयंकर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने महिलेने हिंमत दाखवल्याने तिला फार इजा झाली नाही. अन्यथा एवढ्या कुत्र्यांच्या तावडीतून वाचणे कठीण आहे. महिलेच्या पतीने आता पालिका प्रशासनाकडे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची (help )मागणी केली आहे. सोशल मीडियावर महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा :
गुटखा न दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉड, दांडक्याने बेदम मारहाण
“एक १५० ची तर दुसरी २०० ची..” विदेशी महिलांविषयी तरुणाने केलेल्या ‘त्या’ विधानावरुन नेटीझन्स संतापले
राजू शेट्टी यांची घोषणा, राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू