VIDEO :जीवापेक्षा चहा महत्वाचा, पूराच्या पाण्यात बसून घेतोय चहाचा आनंद

पाऊस आणि वाफाळता चहा हे एक डेडली (tea)कॉम्बिनेशन आहे. कारण मुसळधार पावसात मसालेदार चहा पिण्याची मजा काही औरच असते. पण ही मजा घेण्यासाठी चहाचा कप घेऊन पावसात जाऊन बसण्याची गरज नाही. होय, हे सांगायचं कारण म्हणजे एक तरुण चक्क मुसळधार पावसात बसून चहा घेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लक्षवेधी बाब म्हणजे त्याच्या आसपास भरपूर पाणी साचलं आहे. लोक या पाण्यापासून वाचण्यासाठी इतरत्र पळत आहेत. पण हा व्यक्ती मात्र जगाची फिकीर न करता (tea)मस्तपैकी झुरके मारून चहा पितोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडीओ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर एका पेक्षा(tea) एक भारी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “डर के आगे जीत नही चाय है”, तर कोणी म्हणतेय, “५० रुपये ओव्हर अॅक्टिंगचे कापा”, एकानं म्हटलंय, “पाऊस थांबेपर्यंत याचा चाहा काही संपणार नाही”. तर दुसरा या कमेंटला दाद देत म्हणतोय, “दुनिया जाए भाड में हम तो चाय पिएंगे.

हेही वाचा :

राज्यातील युवकांसाठी खुशखबर! सर्व शासकीय कार्यालयात इंटर्नशिपची संधी उपलब्ध

जितेंद्र आव्हाड यांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले, “राजकारण म्हणजे चित्रपट नव्हे…”

पत्नीची अनंत प्रतीक्षा: ‘तुला भेटायला येतो’ अशी चिठ्ठी आली, पण तो तिरंग्यात गुंडाळून आढळला