Video :हद्दच झाली राव! मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांची रंगली दारू पार्टी

सोशल मीडियावर अनेकदा मुंबई लोकल ट्रेनचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.(travelers) त्यात कधी महिला प्रवाशांत कधी भयानक मारामार होत असते तर कधी काही गंमतीदार व्हिडिओ असतात.प्रत्येक मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणून मुंबई लोकलला ओळखले जाते. मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात.

याच लोकलमधून प्रवास करताना प्रत्येकाला विविध अनुभव येत असतात. लोकलमधील वादविवाद हे लोकल ट्रेनमधील प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सवयीचा भाग बनलाय. मात्र, अनेकदा याच लोकल प्रवासात अनेक विचित्र घटनेचे व्हिडिओ पाहायल मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय,ज्यात लोकलमध्ये काही पुरुष प्रवासी मद्यपान करताना दिसत आहे.

व्हिडिओत धावत्या लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवासी प्रवास करताना दिसत (travelers)आहे. काही व्यक्ती ट्रेनमध्ये काही बसून मद्यपान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून या प्रवाशांविरोद्धात कठोरात- कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नेटकऱ्यांकडून केली जात आहे.

मुंबईच्या लोकलमध्ये प्रवाशांनी केली हद्द पार

व्हायरल व्हिडिओमध्ये काही पुरुष लोकलच्या डब्यातून प्रवास करत असल्याचे तुम्हाला पाहायला मिळत आहे. दरम्यान काही पुरुष प्रवासी लोकल डब्यात खाली बसलेले दिसून येतात. मात्र त्याच्या हातामध्ये मद्यपानाच्या काही बॉट्स दिसून येत आहेत. सर्व प्रकार त्याच डब्यात असलेल्या सह प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया हँडलवरील ((travelers) या इन्स्टाग्रावर अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया व्हिडिओवर येत आहेत.याआधीही सोशल मीडियावर लोकल ट्रेनमधील हाणामारीचे व्हिडिओ व्हायरल झालेत तर कधी चित्र-विचित्र डान्सचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा :

इचलकरंजी: कुख्यात एस.टी. सरकार गॅंगवर माेठी कारवाई

शेतकऱ्यांना भूमिहीन बनविणारा लागेल; कोणत्या महामार्गाबाबत बोलले मुश्रीफ?

सांगली दुष्काळी भागात सरासरीच्या दुप्पट पाऊस