VIDEO VIRAL : ८ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराने मृत्यू”

लहान मुलांमध्येही ह्रदय विकाराचा आजार वाढताना दिसून येत असून गेल्या(place) दोन तीन दिवसात ३ घटना समोर आल्या आहेत. दरम्यान आज गुजरातमधील अहमदाबाद येथील शाळेत तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या ८ वर्षांच्या मुलीचा ह्रदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अहमदाबादच्या थलतेज परिसरातील झेबर स्कूल फॉर चिल्ड्रनमध्ये आज सकाळी ही घटना घडली.गार्गी रणपारा असं मृत मुलीचं नावं आहे. गार्गी सकाळी तिच्या वर्गात जात असताना लॉबीमध्ये खुर्चीवर बसल्यानंतर लगेचच बेशुद्ध पडली,” असे शाळेच्या मुख्याध्यापिका शर्मिष्ठा सिन्हा यांनी सांगितलं. शाळा व्यवस्थापनाने शेअर केलेल्या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये, आठ वर्षांची मुलगी शाळेच्या लॉबीमध्ये चालताना दिसत आहे.

तथापि, तिच्या वर्गात जाताना तिला अस्वस्थ वाटू लागतं. त्यामुळे ती लॉबीमध्ये खुर्चीवर बसते. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यानंतर खुर्चीवरून सरकताना दिसत आहे. ती कोसळली तेव्हा शिक्षक आणि इतर विद्यार्थी लॉबीमध्ये उपस्थित होते.“सकाळी शाळेत गेली तेंव्हा गार्गी व्यवस्थित होती. मात्र ती पहिल्या मजल्यावर तिच्या वर्गात जात असताना ती कॉरिडॉरमध्ये खुर्चीवर बसली आणि अचानक बेशुद्ध पडली. तिला श्वास घेण्यास त्रास होत (place)असल्याने, आमच्या शिक्षकांनी तिला सीपीआर कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन दिले आणि रुग्णवाहिका बोलावली,” असं सिन्हा यांनी पीटीआयला सांगितले. मुलीची प्रकृती गंभीर दिसत असल्याने, कर्मचाऱ्यांनी तिला त्यांच्या स्वतःच्या वाहनाने जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.

डॉक्टरांनी सांगितले की तिला हृदयविकाराचा झटका आला होता आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आलं होतं, मात्र तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलं.“तेथे असलेल्या डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की गार्गीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांनी तिला जिवंत करण्याचा प्रयत्न केला आणि तिला व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवले, परंतु ती वाचू शकली नाही,” शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी (place)मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.

“आम्हाला रुग्णालयातून फोन आला की एका शालेय विद्यार्थिनीचा दाखल झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. आम्ही आमच्याकडून चौकशी सुरू केली आहे आणि तिच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी तिचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे,” असं सेक्टर-१ चे सह पोलीस आयुक्त नीरज बडगुजर यांनी पीटीआयला सांगितलं.बंगळुमध्येही अशीच घटना घडली होती. बंगळुमपासून १७५ किमी असलेल्या चामराज नगर तालुक्यातील बदानुप्पे गावात श्रुती-लिंगराजू यांची मुलगी तेजस्विनीचा आठव्या वर्षी मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :

‘मी फक्त हिंदू मतावरच निवडून आलो,’ नितेश राणेंचे मोठे विधान!

विराट-अनुष्काचा प्रेमानंद महाराजांसमोर साष्टांग दंडवत, अनुष्काने विचारलेले सवाल आणि महाराजांचे उत्तर

‘आय लव्ह यू’ असा मेल केला, रिप्लाय न मिळाल्यावर शिवाली परबनं सांगितले जबरी चाहत्यांचे किस्से