VIDEO VIRAL महिला न्यूज अँकरचा प्रायव्हेट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

पाकिस्तानच्या प्रसिद्ध न्यूज अँकर मोना आलम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत (private life)असलेल्या एका अश्लील व्हिडिओमुळे चर्चेत आल्या आहेत. काही लोकांनी या व्हिडिओशी त्यांचे नाव जोडले, मात्र मोना यांनी यावर जोरदार प्रतिक्रिया देत हा आरोप फेटाळून लावला. त्यांनी हे स्पष्ट केले की, व्हायरल व्हिडिओतील महिला त्या नाहीत आणि हा त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचा कट आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, मोना आलम यांनी धैर्याने आपली बाजू मांडली. त्यांनी ट्विटरवर स्क्रीनशॉट शेअर करत सांगितले की, हा व्हिडिओ त्यांचा नाही आणि त्यांच्या विरोधात दुष्प्रचार मोहीम राबवली जात आहे. यासोबतच त्यांनी संबंधित व्हिडिओतील महिलेची खरी ओळख उघड करत (private life)हा गैरप्रचार थांबवण्याचे आवाहन केले.
मोना आलम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पाकिस्तानी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांनी संबंधित महिलेविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या चुकीच्या व्हिडिओच्या लिंक्स काही वरिष्ठ पत्रकारांनाही पाठवण्यात आल्या, असा दावाही त्यांनी केला आहे. मोना यांचा आरोप आहे की, हा एक नियोजनबद्ध कट असून त्यांना बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे.
— Mona Alam December 18, 2024
This woman’s objectionable video is being spread by petty haters on social media, claiming it’s me.
She’s a proven criminal herself & hence posting her real screen grab for clarity
I’ve moved Agencies;
My character is spotless & all campaigners against it will face the MUSIC! pic.twitter.com/X4pSnMdeX6
ही घटना ही सोशल मीडियावर महिलांना लक्ष्य करण्याच्या (private life)वाढत्या ट्रेंडचा आणखी एक धक्कादायक प्रकार आहे. पाकिस्तानात यापूर्वीही अनेक प्रसिद्ध महिलांना अशाच प्रकारच्या बदनामीच्या मोहिमांना सामोरे जावे लागले आहे.
मोना आलम यांनी हा संघर्ष सच्चाईसाठी सुरू असल्याचे सांगत सायबर बुलिंगविरोधात लढण्याचे आवाहन केले आहे. आता पाहावे लागेल की पाकिस्तानी पोलीस यावर काय कारवाई करतात आणि मोना यांना न्याय मिळतो का.
हेही वाचा :
मोफत रेशन घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ‘या’ लोकांना मिळणार नाही रेशन
गजराजाशी मस्ती मगरीला पडली महागात, सोंडेला पकडताच असे केले… Video Viral
चेन्नईत एड शीरनच्या कॉन्सर्टमध्ये ए. आर. रहमानचा जलवा, ‘उर्वशी-उर्वशी’ने रंगला माहोल!