मारहाणीचे व्हिडिओ, राजकीय नेत्यांना कॉल; सरपंच हत्येप्रकरणी धक्कादायक खुलासा
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख(political leaders) यांच्या हत्येचा तपास आता सीआयडीकडे गेला आहे. याप्रकरणी सीआयडीकडून आतापर्यंत शंभरहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असून याचा वेगवेगळ्या अॅंगलने तपास केला जातोय.
अशात या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये खंडणी(political leaders) प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांच्या पत्नीची देखील चौकशी करण्यात आली आहे. तसेच, कराड संबंधी आणखी दोन महिलांची देखील चौकशी करण्यात आलीये. अशात संतोष देशमुख यांना मारहाणीचे चार व्हिडीओही पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाइलमध्ये आढळले आहेत.
तसेच त्या मोबाइलमधून कोणाला कॉल केले, याचीही माहिती पोलिसांनी घेतली. याच मोबाइलवरून काही राजकीय नेत्यांना देखील कॉल करण्यात आल्याची आतली माहिती आहे. काही मीडिया रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली असून जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे अशी त्यांची नावे आहेत.
तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे फरार आहेत. चाटे आणि केदार या दोघांना तांबवा या गावातून ताब्यात घेण्यात आलं.तर प्रतीक घुले याला स्थानिक गुन्हे शाखेने पुणे जिल्ह्यातून पकडलं. तसेच या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबतही एक अपडेट समोर आली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अशात आज वाल्मिक कराड पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडचे बँक खाते देखील गोठवण्यात आले आहे. त्याचबरोबर इतर आरोपींचीदेखील बँक खाते गोठवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर ही कारवाई झाली.
सीआयडीकडून नुकतीच वाल्मिक कराड यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. तब्बल दोन तास ही चौकशी झाली. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांचे ज्या स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करण्यात आले होते. त्या गाडीची सीआयडीकडून तपासणी करण्यात आली. त्यात आरोपींच्या हातांचे ठसे जुळले आहेत. याशिवाय, आरोपींचे मोबाइलही पोलिसांना सापडले आहेत. याच मोबाइलमध्ये मारहाणीचे व्हिडिओ आढळले आहेत.
हेही वाचा :
गप्पा मारत बसणाऱ्या कुटुंबावर संतप्त शेजाऱ्यांकडून जीवघेणा हल्ला, घर जाळण्याचा प्रयत्न
प्रसिद्ध कोरिओग्राफर सुशील ओहळ याचे ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ या गाण्याद्वारे संगीत विश्वात पदार्पण
प्रेमप्रकरणातून तरूणीची हत्या; मृतदेह फेकला जंगलात अन् नंतर त्याच आरोपीनं…