विद्या बालनचा ‘अमी जे तोमार’ 17 वर्षांनंतर माधुरी दीक्षितसोबत होणार रिक्रिएट
कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरी यांचा बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 3’(new film) दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
चित्रपटाच्या(new film) ट्रेलरमध्ये माधुरी दीक्षित, विद्या बालन आणि नित्या मेनन यांसारख्या स्टार्सची झलक पाहायला मिळाली आहे. या चित्रपटाचा टायटल ट्रॅक जागतिक स्तरावर हिट झाला आहे, संपूर्ण देश या गाण्याच्या तालावर थिरकतो आहे. काही तासांपूर्वीच ‘जाना समझो ना’ या चित्रपटामधील दुसरे गाणेही रिलीज झाले आहे. त्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
आगामी चित्रपट “भूल भुलैया 3” मधील बहुप्रतिक्षित गाणे “अमी जे तोमार 3.0” अखेर 17 वर्षांनंतर चाहत्यांच्या भेटीस आले आहे. याआधी हिट राहिलेले आणि लोकांशी जोडले गेलेले हे आयकॉनिक गाणे एका अप्रतिम ट्विस्टसह पुन्हा कल्पित करण्यात आले आहे, ज्यामध्ये विद्या बालन आणि दिग्गज माधुरी दीक्षित यांचा समावेश आहे. मूळ आवृत्तीतील विद्या बालनच्या नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घातली आणि या पुनरुज्जीवनात तिचे पुनरागमन तितकेच मंत्रमुग्ध करणारे हे गाणं असणार आहे. या गाण्यामध्ये या दोन्ही उत्कृष्ट अभिनेत्याची नृत्याची झलक पाहायला मिळणार आहे. चाहत्यांनी हे गाणं रिलीज होताच डोक्यावर घेतले आहे.
या गाण्यामध्ये विद्या आणि माधुरी एकत्र येऊन एक शाही परफॉर्मन्स सादर करत आहेत, जे दोन शास्त्रीय नृत्य प्रकारांचे अनोखे मिश्रण आहे, जे प्रेक्षकांना भुरळ घालणार आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक चिन्नी प्रकाश यांनी कोरिओग्राफ केलेले कथ्थक आणि भरतनाट्यमचे त्यांचे सुंदर एकत्रित सादरीकरण दृश्य चमत्कार ठरणार आहे. हा चमत्कार पाहण्यासाठी चाहते चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
‘अमी जे तोमार ३.०’ हे केवळ गाणे नाही तर हे भारतीय शास्त्रीय नृत्याचा उत्सव आहे आणि या प्राचीन कला प्रकारांच्या कालातीत सौंदर्याचा पुरावा आहे. या दोन पॉवरहाऊस कलाकारांच्या सहकार्याने एक अविस्मरणीय सिनेमा क्षण निर्माण केला आहे. ‘भूल भुलैया 3’ हा चित्रपट येत्या दिवाळीमध्ये धमाका करायला येणार आहे. ‘भूल भुलैया 3’च्या तिसऱ्या भागात कार्तिक आर्यन पुन्हा एकदा ‘रूह बाबा’च्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत तृप्ती डिमरी अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. अनीस बज्मीचा हा चित्रपट दिवाळीत अजय देवगणच्या ‘सिंघम अगेन’शी टक्कर देणार आहे.
हेही वाचा :
शरद पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चिघळवला, ‘या’ नेत्याचं टीकास्त्र
दिवाळीच्या तोंडावर मोदी सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार डबल फायदा!
ठाकरे, शिंदे की फडणवीस? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत सर्वेक्षणात धक्कादायक खुलासा