विराट कोहलीने बांगलादेशला डिवचलं; नागीन डान्स करत मैदान गाजवलं Video

चेन्नई कसोटीत(match) भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशची धावसंख्या 4 बाद 158 अशी होती. बांगलादेशला विजयासाठी 357 धावांची गरज आहे. त्याचबरोबर टीम इंडियाला 1-0 अशी आघाडी घेण्यासाठी 6 विकेट्स घ्याव्या लागतील.

याचदरम्यान विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये विराट कोहली शाकिब अल हसन बाद केल्यानंतर नागीन डान्स करताना दिसत आहे. तसेच विराट कोहलीच्या या डान्सला चाहते देखील चांगला प्रतिसाद देत आहेत.

बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला रवींद्र जडेजाने झेलबाद केले. मात्र, या झेलवर पंच ठाम नव्हते. पण रिप्लेमध्ये शाकिब अल हसन बाद झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर विराट कोहलीने मैदानावर(match) जोमाने नाचायला सुरुवात केली. सध्या विराट कोहलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विराट कोहली पहिल्या डावात केवळ 6 धावा करुन बाद झाला होता. त्यामुळं त्याच्याकडून दुसऱ्या डावात मोठ्या खेळीची अपेक्षा होती. विराट कोहलीनं त्यानुसार चांगली सुरुवात देखील केली होती. त्यानं 37 बॉलमध्ये 17 धावा केल्या होत्या. मात्र, मेहेदी हसन मिराज याच्या गोलंदाजीवर त्याला एलबीडबल्यू बाद देण्यात आलं.

https://twitter.com/i/status/1837505504890765313

आतापर्यंत भारतीय संघ स्पर्धेत पुढे असल्याचे दिसून येत आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशने तीन दिवस पूर्ण होईपर्यंत 4 विकेट्स गमावत 158 धावा केल्या. टीम इंडियाने बांगलादेशसमोर 515 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आता बांगलादेश संघाला विजयासाठी 2 दिवसात 357 धावांची गरज आहे. बांगलादेशकडे 2 दिवस शिल्लक आहेत, परंतु त्यांनी आतापर्यंत 4 विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळे भारताचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.

हेही वाचा:

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूषखबर!

नितीश कुमारांच्या कार्यक्रमात माशांची लूट, Video Viral

‘एवढे घाबरट, गद्दार मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीही पाहिलेले नव्हते’, आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल