IPL मॅच दरम्यान विराट कोहलीच्या बोटांना दुखापत, RCB चं टेन्शन वाढलं

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात बुधवारी आयपीएल 2025 चा 14 वा सामना खेळवला गेला. या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीवर 8 विकेटने विजय मिळवला(Virat Kohli) तसेच आरसीबीच्या विजयी रथ रोखण्यात त्यांना यश आले.

कारण यापूर्वी नव्या आयपीएल सीजनचे सलग दोन सामने जिंकण्यात आरसीबीला यश आले होते. तसेच या सामन्या दरम्यान आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली(Virat Kohli) याच्या बोटांना दुखापत झाली. त्यामुळे संघातील महत्वाच्या खेळाडूला दुखापत झाल्यामुळे आरसीबीचं टेन्शन वाढलं आहे.

गुजरात टायटन्सच्या इनिंगची 12 वी ओव्हर सुरु असताना फलंदाज साई सुदर्शनने क्रुणाल पांड्याच्या बॉलिंगवर जोरदार फटकेबाजी केली. या दरम्यान साईने एका बॉलवर स्वीप शॉट मारला, त्यावेळी विराट डीप मिड विकेट फिल्डिंग करत होता. विराटने बॉल थांबवण्याचा प्रयत्न केला, पण बॉल थांबवण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या हातून बॉल निसटला आणि त्याच्या डाव्या हाताला लागून ती बाउंड्री पार गेला.

यानंतर विराट कोहली लगेचच गुडघ्यांवर खाली बसला आणि त्याने दुखापत झालेल्या बोटाला पकडले. यामुळे स्टेडियममध्ये काही वेळ शांतता पसरली आणि तेवढ्यात आरसीबीचा मेडिकल स्टाफ मैदानावर आला. विराट कोहलीने डीप मिड-विकेटवर फिल्डिंग करताना स्वतःच्या बोटांना दुखापत करून घेतली.

आरसीबीच्या मेडिकल टीमने विराट कोहलीच्या दुखापतीवर फर्स्ट टेड केल्यावर विराटने पुन्हा सामना खेळायला सुरुवात केली. परंतु तो वारंवार त्याची बोटं मोडत होता. विराटच्या बोटांना झालेली दुखापत किती गंभीर आहे याबाबत अद्याप माहिती मिळाली नाही परंतू फॅन्स प्रार्थना करतायत की सगळं ठीक असेल.

चिन्नस्वामी स्टेडियमवर गुजरात टायटन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे आरसीबीला प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावे लागले. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 169 धावा करू शकली. त्यांनी गुजरातला विजयासाठी 170 धावांचे आव्हान दिले. हे आव्हान गुजरातने 17.5 ओव्हरमध्ये दोन विकेट गमावून पूर्ण केले.

हेही वाचा :

भारताच्या शत्रू देशाबाबत बाबा वेंगा यांचं सर्वात मोठं भाकीत समोर

Sikandar ला सपोर्ट मिळत नसल्याने सलमान खान भावूक, म्हणाला

शेतकऱ्यांना गुडन्यूज! शेततळे, विहीर बांधकामासाठी माती अन् खडीवरील रॉयल्टी माफ; सरकारचा निर्णय