विराट कोहलीच महिलेसोबत जोरदार भांडण, VIDEO VIRAL

सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियात आहे. तिथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु आहे. (out reach)गाबा टेस्ट संपल्यानंतर टीम इंडिया मेलबर्नला पोहोचली आहे. इथे दाखल होताच विराट कोहली एका मोठ्या वादात सापडला आहे. मेलबर्नमध्ये दाखल होताच विराट कोहलीचा एका महिला पत्रकारासोबत वाद झाला आहे. एअरपोर्टवर विराट कोहली बराच वेळ महिला पत्रकारासोबत वाद घालत होता. आता प्रश्न हा आहे की, विराट कोहली अखेर या महिला पत्रकारावर इतका का भडकला?. ऑस्ट्रेलियन पत्रकाराने विराट कोहलीच्या मुलांचे फोटो काढले त्यावरुन हा दिग्गज क्रिकेटर भडकला.

विराट कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात तो महिला पत्रकारासोबत बोलताना दिसतोय. विराट बोलताना खूप रागात दिसतोय. विराट कोहली ऑस्ट्रेलियन पत्रकारांना बोलला की, तुम्ही माझ्या परवानगीशिवाय माझ्या मुलांचे फोटो काढू शकत नाही. चॅनल 7 चा दावा आहे की,(out reach) विराटच्या मुलांचे कुठलेही फोटो काढले नाहीत किंवा व्हिडिओ बनवलेला नाही. विराट कोहलीने सर्वांना सांगितलं की, प्रायव्हसी गरजेची आहे. त्याच्या परवानगीशिवाय कोणी त्याचा व्हिडिओ बनवू शकत नाही.

विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियन पत्रकार आणि फोटो जर्नलिस्ट सोबतचा हा वाद सगळ्या ऑस्ट्रेलियात चर्चेचा विषय बनलाय. ऑस्ट्रेलियन मीडियामध्ये विराट कोहलीवर टीका सुरु आहे. तसे विराट आणि ऑस्ट्रेलियन मीडियाचे संबंध याआधीपासून चांगले नाहीयत. याआधीच्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यात सुद्धा(out reach) त्याचा तिथल्या मीडियासोबत वाद झाला आहे. पण यावेळी विषय थोडा वेगळा आहे.मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियात 26 डिसेंबरपासून चौथा कसोटी सामना सुरु होणार आहे. टेस्ट सीरीज सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. पर्थ कसोटी सामना भारताने जिंकला. एडिलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. ब्रिसबेन टेस्ट मॅच ड्रॉ झाली. आता मेलबर्नमध्ये मालिकेत कोण आघाडी घेतो? त्याची उत्सुक्ता आहे.

हेही वाचा :

झोपा कामावर आणि नोकरी गमवा? न्यायालयाचा ठोस निर्णय

वर्षाच्या शेवटी सोन्याची आनंदवार्ता, ‘इतक्या’ रुपयांनी घसरले भाव

निवडणूक होताच प्रवाशांना पहिला झटका, लालपरीचा प्रवास महागणार?