अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीवरून विशाल पाटलांचे गंभीर आरोप; महाराष्ट्राच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सांगली: सीमावादानंतर गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र सरकारचे आणि शेजारील कर्नाटक सरकारशी आलमड्डी धरणावरून(Dam) सातत्याने खटके उडत आहेत. अनेकदा यावरून टोकाचा संघर्षही पाहायला मिळाला. धरणाची उंची वाढवण्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून मोठा विरोध केला जात आहे.

या सगळ्यात काँग्रेस आमदार विशाल पाटील यांनी आलमड्डी धरणाच्या मुद्द्यावरू पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची(Dam) उंची वाढवण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला कृष्णा पाणी लवादानेही मंजुरी दिली आहे. मात्र, यावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. खासदार विशाल पाटील यांनी भाजपवर टीका करताना हा मुद्दा केवळ राजकारणासाठी उचलला जात असल्याचा आरोप केला आहे.
केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी संसदेत तारांकित प्रश्नाला उत्तर देताना, महाराष्ट्रासह कोणत्याही राज्याने या उंची वाढीला विरोध केल्याचा अधिकृत प्रस्ताव दिला नसल्याचे स्पष्ट केले. या खुलाशामुळे महाराष्ट्र सरकारची भूमिका संशयास्पद ठरली आहे. विशाल पाटील यांनी यावर भाजप सरकारवर टीका करत महाराष्ट्राने अधिकृतरित्या या निर्णयाला विरोध करणे आवश्यक होते, असे मत मांडले. पणभाजप केवळ राजकीय लाभासाठी हा मुद्दा उचलून धरत आहे, पण प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या हितासाठी कोणतीही ठोस भूमिका घेत नाही.
अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढल्यास, धरणाची पाणी पातळी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत पोहोचू शकते. जलतज्ज्ञांच्या मते, यामुळे सांगली आणि कोल्हापूर हे दोन्ही जिल्हे पावसाळ्यात जलमय होण्याची शक्यता वाढू शकते. कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच,कृष्णा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी साठून फुगवटा निर्माण होईल, परिणामी अनेक गावे जलमय होण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.
विशाल पाटील यांनी केंद्र सरकारला तांत्रिक समिती नेमण्याची मागणी संसदेत केली होती. परंतु, महाराष्ट्र सरकारने अद्याप स्पष्ट भूमिका घेतली नाही. या निर्णयामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे महाराष्ट्राने अधिक ठोस पावले उचलावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अलमट्टी धरणाचा विषय महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासोबतच पूरस्थिती आणि जलव्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजप आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यावरून आगामी काळात जोरदार राजकीय संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
‘या’ अभिनेत्याने अखेर चाहत्यांना दाखवला मुलाचा चेहरा!
वाहनधारकांसाठी मोठी बातमी! टोलचं झंझट कायमचं मिटणार
अमित ठाकरे भाजपच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त आमदार होण्याची शक्यता