बोटाला शाई लावून मतदारांना मिळतोय माल! अंबादास दानवेंनी थेट केला Video Viral

छत्रपती संभाजीनगर : राज्यामध्ये विधानसभा(political) निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. मागील दीड महिन्यापासून जोरदार सुरु होता. आता उद्या (दि.20) मतदान होणार असून नेत्यांचे भवितव्य पेटीमध्ये बंद होणार आहे. राज्यामध्ये बंडखोरीचे राजकारण झाल्यानंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय भविष्य ठरवणारी ही निवडणूक असणार आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीकडून मतदानाच्यापूर्वी पैसे वाटप सुरु असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे(political) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. देवळाई तांडा येथे माजी नगरसेवकाकडून पैसे वाटप करत असल्याचा व्हिडिओ देखील अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मतदारांच्या बोटाला शाई लावून पैसे वाटप करत असल्याचा आरोप केला आहे. पोलिसांच्या देखरेखीखाली हे पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. या संदर्भात पोलीस आयुक्तांची महासंचालक व निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

संभाजीनगरमधील पैसे वाटपाचा व्हिडिओ शेअर केल्यानंतर पत्रकार परिषद घेत अंबादास दानवे यांनी महायुतीवर(political) जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “मतदानापूर्वी शाई बाहेर आलीच कशी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पोलीस व निवडणूक आयोग या संदर्भात आक्रमकतेने कारवाई का करत नाही? पोलीस यंत्रणा अशा पद्धतीने मदत करते की काय अशी स्थिती आहे, असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.

त्याचबरोबर पराभव समोर दिसताच, संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाठ यांचा काय निवडणूकीचा १०० कोटींचे टार्गेट आहे का, असं दिसतय? सरास पैसे पोलिसांच्या नाखाकाली टिच्चून वाटले जात आहे. तरी निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा षंडासारखे बघ्याची भुमिका घेतेय,” असा घणाघात अंबादास दानवे यांनी केला आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, “छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे.

याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. ‘कर्तव्यदक्ष’ जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने निवडणूक आयोग व महाराष्ट्र प्रशासनाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी,” अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे.

हेही वाचा :

एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला सर्वात मोठा झटका!

‘तारक मेहता…’ मालिकेतील जेठालालनं धरली निर्माता असित मोदी यांची कॉलर

पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल; ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी असं वक्तव्य का केलं?