दुपारच्या जेवणानंतर किमान १०० पावलं चालणं आरोग्यासाठी भारी

दुपारचं जेवण हे सकाळच्या नाष्ट्यापेक्षा आणि रात्रीच्या जेवणापेक्षा जड (lunch)असतं. त्यामुळे शरीराला ते पचवण्यासाठी वेळ लागतो. परंतु बरेच लोक जेवणानंतर लगेच बसून काम करतात किंवा झोपायला जातात, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. एक्सपर्ट सांगतात की, दुपारच्या जेवणानंतर किमान १०० पावलं चालणं फायदेशीर ठरतं. असं केल्यास काय फायदे होतात हे जाणून घेऊया.वॉक करणं ही सर्वात सोपी आणि प्रभावी व्यायामपद्धती मानली जाते. अनेक लोक सकाळी आणि संध्याकाळी चालण्याची सवय लावतात, पण दुपारच्या जेवणानंतर फार कमी लोक चालतात. मात्र, दुपारच्या जेवणानंतर चालणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं.

जेवणानंतर चालण्याचे आश्चर्यकारक फायदे
दुपारच्या जेवणानंतर थोडावेळ पायी चालल्याने शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. विशेषतः स्नायूंना ग्लुकोज शोषण्यास मदत होते, ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढत नाही आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.

पचन सुधारायचंय? १०० पावलं चालाच
दुपारच्या जेवणानंतर थोडं पायी चालणं हे पचनसंस्थेसाठी आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. हलक्या गतीने चालल्याने पचनक्रिया सुधारते आणि आतड्यांचे कार्य नियमित राहते. जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी चालल्यास अ‍ॅसिडिटी आणि गॅसचा त्रास होत नाही. चालल्याने पचनक्रिया (lunch) सुरळीत होते आणि मलप्रवृत्ती सुधारते.

थोडंसं चालणं, भरपूर फायदे
दुपारच्या जेवणानंतर थोड्यावेळ पायी चालल्याने एंडोर्फिन हार्मोन्स रिलीज होतात. हे हार्मोन्स टेन्शन कमी करण्यास, मूड सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दिवसभर मानसिक आरोग्य उत्तम राहते.

निरोगी जीवनाची गुरुकिल्ली – चालण्याची सवय
दुपारच्या जेवणानंतर नियमित चालण्याची सवय लावल्यास हृदय निरोगी राहते आणि हृदयरोगांचा धोका कमी होतो. चालल्यामुळे ब्लड फ्लो वाढतो, बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं (lunch)आणि ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं.

थोडं चला, निरोगी बना
दुपारच्या जेवणानंतर हलकी एक्सरसाइज किंवा चालण्याची सवय लावल्यास सर्केडिअन रिदम नियंत्रित होतो, शरीराची आवश्यकता संतुलित होते आणि मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन वाढते. याचा थेट परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर होतो आणि रात्री गाढ झोप लागते.

हेही वाचा :

चालय काय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार महाराष्ट्र घटनेनं हादरल

संतोष देशमुखांचे फोटो पाहून युवकाने केली आत्महत्या कुटुंबीयांना मोठा धक्का

‘या’ 3 तारखेला जन्मलेले लोक असतात भांडखोर; मात्र जोडीदाराची घेतात काळजी