वीकेंडला हाय प्रोटीन ब्रेकफास्ट हवाय? मग ही नो-ब्रेड ‘मूग डाळ सँडविच’ रेसिपी तुमच्यासाठीच

वीकेंडला कुटुंबातील सगळेच घरी असतात. अशावेळी काहीतरी हेल्दी आणि टेस्टी बनवायला(loves) सगळ्यांनाच आवडतं. तुम्ही ही ब्रेकफास्टसाठी काही हेल्दी आणि पोटभर खाण्याची रेसिपी शोधताय? मग ही मूग डाळीपासून तयार होणारी सँडविच रेसिपी नक्की ट्राय करा. विशेष म्हणजे यामध्ये ब्रेडचा वापर न करता उच्च प्रोटीनयुक्त घटक वापरले आहेत. त्यामुळे ही रेसिपी स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठी देखील उत्तम आहे.

 

साहित्य
मूग डाळ – 1 कप (loves) 2-3 तास भिजवलेली

आले – 1 इंच

हिरवी मिरची – 1

हळद – 1/4 टीस्पून

मीठ – चवीनुसार

बेकिंग पावडर – 1/4 टीस्पून

किसलेलं पनीर – 1/2 कप

किसलेलं गाजर – 1/4 कप

हिरवी चटणी

काकडी, टोमॅटो, कांदा (स्लाइस केलेले)

चाट मसाला

कृती
भिजवलेली मूग डाळ मिक्सरमध्ये हिरवी मिरची आणि(loves) आले घालून बारीक वाटून घ्या.

हे पीठ एका बोलमध्ये घेऊन त्यात हळद, मीठ, किसलेलं पनीर आणि गाजर मिसळा.

शेवटी बेकिंग पावडर घालून नीट फेटा.

हा तयार मिश्रण सँडविच ग्रिलरमध्ये दोन्ही बाजूंनी शेकून घ्या. ग्रिलर नसेल, तर हेच पीठ तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या.

शिजलेल्या तुकड्यांमध्ये हिरवी चटणी लावा, त्यावर काकडी, टोमॅटो आणि कांद्याचे स्लाइस ठेवा. चाट मसाला भुरभुरवा आणि सँडविच तयार!

हेही वाचा :