युद्ध कथा रम्य नसतात निष्पाप लोक मरत असतात

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी :

युद्धस्य कथा रम्य: अर्थात युद्ध कथा ऐकायला बऱ्या वाटतात असे म्हटले जाते. (nature)प्रत्यक्षात मात्र युद्धाचे स्वरूप भीषण असते, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम अतिशय गंभीर असतात. आपणाला दूरचे डोंगर सुंदर वाटू लागतात, मात्र जेव्हा आपण डोंगराच्या समीप जातो तेव्हा त्याचे खरे रूप आपणाला दिसते आणि ते चांगले नसते. युद्धाच्या रम्य कथांचे रूप असेच असते.पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कथा युद्ध क्षेत्राच्या बाहेरच्या लोकांनी फक्त ऐकलेल्या आहेत. आता मात्र जगातील कोणत्याही दोन देशांमध्ये सुरू असलेले युद्ध आपणाला घरच्या छोट्या पडद्यावर लाईव्ह दिसते. क्षेपणास्त्रांचा मारा,
जमिनीवरचे युद्ध, आणि त्याची दाहकता आपण सर्व प्रत्यक्ष बघत असतो. हे सर्व डिजिटल क्रांतीमुळे घडले आहे.

अशा प्रकारच्या क्रांतीमुळे दोन देशांमधील युद्ध हे काही दिवसांचे असेल,ते वार रूम मधून खेळले जाईल, हे युद्ध बटन दाबण्याचे असेल, थोडक्यात सांगायचे झाले तर” खटक्यावर बोट जाग्यावर पलटी”अशा प्रकारची युद्धे असतील असे सर्वांनाच वाटत होते, इतकेच नव्हे तर युद्ध तज्ज्ञांची मते सुद्धा अशाच प्रकारची होती. प्रत्यक्षात मात्रसध्या उलटेच घडताना दिसते आहे. उदाहरणच द्यायचे असेल तर इजराइल आणि अरब कंट्रीज तसेच रशिया(nature) आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे देता येईल. कारण ही युद्धे बराच काळ चाललेली आहेत. दोन वर्षानंतर इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन यांच्यात युद्धबंदी करार झालेला आहे. आणि सध्या तेथे शांतता प्रस्थापित झालेली आहे. मात्र रशिया विरुद्ध युक्रेन यांच्यातील युद्धाला तीन वर्षांचा कालावधी लोटून गेलेला आहे आणि अद्यापही हे युद्ध थांबायला तयार नाही.


एकेकाळी सोवियेत युनियन म्हणजे अविभाज्य रशियाचा युक्रेन हा एक भाग होता. रशियाचे विघटन झाल्यानंतर युक्रेन हा एकच खनिज समृद्ध देश म्हणून ओळखला जाऊ लागला.युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकीयांनी नाटो संघटनेत युक्रेनला सदस्यत्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि त्यांची ही कृती रशियाला आवडली नाही. रशियन खोऱ्यात त्यामुळे युरोपियन राष्ट्रांचा हस्तक्षेप वाढेल म्हणून रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेन वर हल्ला करून युद्ध घोषित केले.गेल्या तीन वर्षांपासून या दोन देशात घनघोर संग्राम सुरू आहे. तथापि सर्वार्थाने बलाढ्य असलेल्या रशियाला युक्रेंनवर विजय मिळवता आलेला नाही. पाश्चात्त्य राष्ट्रांच्या कडून सर्व प्रकारची युद्ध शस्त्रे युक्रेनला मिळत गेल्यामुळे आणि आजही या शस्त्रांचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्यामुळे रशियाला हे युद्ध जिंकण्यात मोठ्या अडचणी आलेल्या आहेत.


या दोन देशातील युद्धामध्ये सर्वाधिक हानी अर्थातच युक्रेंनची झाली आहे. कोणतेही क्षेत्र रशियाच्या निशाण्यापासून वाचलेले नाही. रशियाने पदाकांत केलेला भूप्रदेश युक्रेने पुन्हा मिळवलेला असला तरी आजही युक्रेंचा अठरा टक्के भूभाग रशियन सैन्याने आपल्या ताब्यात ठेवलेला आहे.या युद्धात 46 हजार सैनिक शहीद (nature)झाल्याचे युक्रेंनच्या प्रशासनाने जाहीर केले असले तरी हा आकडा 70 हजाराच्या आसपास असल्याचे बोलले जाते. याशिवाय युक्रेनचे सुमारे चार लाख सैनिक जखमी झालेले आहेत.रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनच्या सर्व पायाभूत सुविधा उध्वस्त झालेल्या आहेत. 120 अब्ज डॉलरचे नुकसान झालेले आहे. जेनेस्तक, खारकीव,कीव, खैरसन भागात सर्वाधिक नुकसान झालेली आहे. 2000 पेक्षा अधिक नागरी वस्त्यांवर रशियाने हल्ले केलेली आहेत. त्यातून 1हजार बहुउद्देशीय इमारती, तितकीच निवासी संकुले, 250 पेक्षा अधिक व्यापारी संकुले, 250 पेक्षा अधिक शाळा इमारती, मोठे कारखाने, 100 पेक्षा अधिक सार्वजनिक रुग्णालय या युद्धात उध्वस्त झालेली आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर युक्रेन मधील लक्षामधील लोकांनी शेजारच्या देशात आश्रय घेतला आहे. सात लाख लोक शेजारच्या खिशामध्ये सध्या आश्रयाला आहेत.


युद्धामध्ये केवळ सैनिकच मारले जातात असे नाही तर दोन्ही देशातील निष्पाप नागरिकांनाही जीव गमवावा लागतो. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमधील सुमारे दोन ते चार लाख नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत.जगातील दुर्मिळ खनिजा पैकी पाच टक्के खनिजांचा साठा युक्रेन मध्ये आहे. त्यामुळे या देशाचे महत्त्व जगाच्या पाठीवर मोठे आहे. ही खनिजे आपल्या ताब्यात असावीत असे रशियासह काही देशांना वाटते आहे. या युद्धात रशियाला उत्तर कोरियाने सुद्धा साथ दिलेली आहे. युक्रेनच्या तुलनेत रशियाची हानी कमी झालेली असली तरी सैनिकांची जीवितहानी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. मात्र सैनिकांच्या मृत्यूचा आकडा रशियाकडून लपवला जात असल्याचे युद्ध विश्लेषकांचे मत आहे. या युद्धात कोरियन जवानही कामी आलेले आहेत.


मी राष्ट्राध्यक्ष पद सोडल्यामुळे युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होणार असेल आणि युक्रेनला नाटो संघटनेत सदस्यत्व मिळत असेल तर मी सत्तेचा त्याग करायला तयार आहे असे राष्ट्राध्यक्ष झेलनस्की यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूक प्रचार काळात मी केवळ एका दिवसात हे युद्ध थांबवू शकतो असे म्हटले होते. प्रत्यक्षात मात्र तसे अद्याप घडलेले नाही. तथापि हे घडणार नाही असे नव्हे. ट्रम्प आणि पुतीन हे दोघे नेते चर्चेसाठी समोरासमोर एकत्र येतील तेव्हा या दोन देशातील युद्ध थांबू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही जागतिक नेत्यांनी हे युद्ध थांबावे यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पण त्यांना यश मिळालेले नाही. ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला तर युद्ध थांबण्यास नक्कीच मदत होणार आहे. तो सुदिन लवकरच यावा. कारण या युद्धाचे प्रतिकूल परिणाम भारतासह अनेक देशांवर झालेले आहेत.

हेही वाचा :

कॅन्सरमुळे प्रसिद्ध गायकाचे निधन…

शरद पवारांचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्रित प्रवास अन् राजकीय वर्तुळात चर्चा

मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल