अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागांना अलर्ट जारी

सध्या महाराष्ट्र राज्यात तसेच देशभरात(unseasonal) हवामानात मोठे आणि लक्षणीय बदल अनुभवायला मिळत आहेत. हवामान खात्याने दिलेल्या नवीनतम माहितीनुसार, देशाच्या आणि राज्याच्या काही भागांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हे एकाच वेळी अनुभवायला मिळणारे दुहेरी हवामान चिंताजनक असून, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

देशातील उष्णतेची लाट
देशाच्या पश्चिम भागात, विशेषतः राजस्थान आणि गुजरात राज्यातील सौराष्ट्र-कच्छ या परिसरात ७ ते ९ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट अधिक तीव्र झाली आहे. बारमेर आणि कांडला यांसारख्या ठिकाणी तापमान ४५ अंश सेल्सियसच्या पुढे नोंदवले गेले आहे, ज्यामुळे ही ठिकाणे देशातील सर्वाधिक उष्ण ठिकाणांपैकी ठरत आहेत. या तीव्रतेमुळे ७ आणि ८ एप्रिलसाठी रेड अलर्ट, तर आज म्हणजेच ९ एप्रिलसाठी ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला आहे. यासोबतच, दिल्ली , हरियाणा, पंजाब , चंदीगड, पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेश या (unseasonal)उत्तर आणि मध्य भारतातील भागांमध्येही तापमानात झपाट्याने वाढ होत असून, येथे १० एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आले आहेत.
एकीकडे उष्णतेचा हा वाढता प्रकोप असताना, दुसरीकडे देशाच्या दक्षिण भागात केरळ , तामिळनाडू आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासाठी त्या-त्या राज्यांमध्ये परिस्थितीनुसार यलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामान खात्याने उष्ण लाटेच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर, विशेषतः पश्चिम आणि उत्तर भारतातील नागरिकांना, दुपारच्या वेळेत अत्यंत आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे, असा महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
कुठे उन्हाचा तडाखा
महाराष्ट्रामध्ये सुद्धा हवामानाची ही बदलती आणि दुहेरी परिस्थिती स्पष्टपणे दिसून येत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज, बुधवार, ९ एप्रिल रोजी राज्यातील पालघर , रायगड, ठाणे , मुंबई , रत्नागिरी या कोकण किनारपट्टीच्या भागांसह उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर , जालना आणि विदर्भातील अकोला , अमरावती व नागपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (unseasonal)इशारा देण्यात आला आहे. याची प्रचिती नुकतीच आली जेव्हा रविवारी नागपूरसह राज्यातील अनेक शहरांचे दिवसाचे कमाल तापमान ४४ अंश सेल्सियसच्या पुढे गेले होते, ज्यामुळे तेथील जनजीवनावर परिणाम झाला आहे.
एकीकडे उष्णतेची लाट असताना, दुसरीकडे राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे सावट घोंगावत आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, येत्या ११ आणि १२ एप्रिल रोजी (शुक्रवार आणि शनिवार) प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया , नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या दहा जिल्ह्यांचा समावेश आहे. या बदलत्या हवामान परिस्थितीमुळे शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
हेही वाचा :
घटस्फोटानंतर सोहेल खानसोबत दिसणारी ‘मिस्ट्री गर्ल’ कोण?
ओपन मॅरेज म्हणजे नक्की काय?, जाणून घ्या काय आहे हा प्रकार
ग्रामपंचायत ते नगरविकास, सामान्यांसाठी मंत्रिमंडळाची मोठी भेट! ९ निर्णय झाले
खेळाडूची चूक आणि Virat Kohli संतापला, रागात मैदानावर… Video Viral