हॉस्पिटलच्या वॉशरूममध्येच महिलांचे व्हिडिओ बनवत होता ‘तो’; जेव्हा कारनामा समोर आला तेव्हा मात्र…
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात राजधानी दिल्लीतील दीपचंद बंधू या सरकारी रुग्णालयात(hospital) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील ओपीडीमध्ये असलेल्या टॉयलेटमधून महिलांचे व्हिडिओ बनवणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली.
रुग्णालयाकडून(hospital) याबाबत तक्रार देण्यात आली. या तक्रारीनंतर, न्यू सीलमपूर येथील रहिवासी 24 वर्षीय नितेशविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. महिलांच्या वॉशरुममध्ये अशा प्रकारचे व्हिडिओ काढण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी देखील वेगवेगळ्या शहरांमध्ये अशी प्रकरणे अनेकदा उघडकीस आली आहेत. त्यानंतर आता दिल्लीतील सरकारी रुग्णालयातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
बंगळुरू पोलिसांनी एका 21 वर्षीय विद्यार्थ्याला कॉलेजच्या बाथरूममध्ये महिलांचे रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अटक केली होती. ही घटना उघडकीस आल्यानंतर कॉलेज कॅम्पसमध्ये प्रचंड निदर्शने सुरू झाली, त्यानंतर पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना शांत केले. रेकॉर्डिंग पकडल्यानंतर आरोपींनी तक्रारकर्त्यांना धमकावले. त्यांनी प्रकरण पुढे करून तक्रार केल्यास जीवे मारेन, अशी धमकीही दिल्याचे समोर आले होते.
आरोपींनी त्यांच्या फोनवर व्हिडिओ रेकॉर्ड करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा दावा तक्रारकर्त्यांनी केला आहे. या विद्यार्थ्याने त्याच्या मोबाईलवर सुमारे आठ व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची माहिती सध्या दिली जात आहे.
फोटोग्राफर असलेल्या तरुणाला अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये अनुराधा मुक्तेश्वर पाटील (सध्या रा. नऱ्हे, मूळ रा. सोलापूर) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका फोटोग्राफरने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हेही वाचा :
शेकोट्या पेटल्या, राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार?
धक्कादायक! अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार
‘पुष्पा- द रुल’च्या ट्रेलर लाँचदरम्यान उडाला गोंधळ, अल्लू अर्जुनच्या चाहत्यांवर झाला लाठीचार्ज!