‘याच्या पाठीत खरंच चाकू घुसला होता का?’; सैफ अली खान डिस्चार्जनंतर सोशल मीडियावर ट्रोल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर काही दिवसांपूर्वी त्याच्या वांद्रे येथील निवासस्थानी एका चोरट्याने हल्ला केला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात(hospital) दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.

मात्र, काल (२१ जानेवारी) रुग्णालयातून(hospital) डिस्चार्ज मिळाल्यानंतर अवघ्या काही तासांतच सैफ अगदी तंदुरुस्त चालताना दिसल्याने, नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याच्या शस्त्रक्रियेबद्दल आणि प्रकृतीबद्दल सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

रुग्णालयातून(hospital) डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ त्याच्या सद्गुरू शरण या निवासस्थानी पोहोचला. गाडीतून उतरल्यानंतर तो अगदी आरामात चालताना दिसला. यावेळी त्याने पांढरा शर्ट, निळी जीन्स आणि काळा चष्मा घातला होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एका युजरने लिहिले, “वाह, हा कसला जोक आहे?’ लीलावतीची जादू अद्भुत आहे. गंभीर दुखापतीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर एखाद्या गार्डन, पार्कमध्ये फिरायला जातोय, असा चालला आहे? हे नक्कीच एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखं वाटतंय. मूर्ख बनवण्याची कला सुरूच आहे.” अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

सैफवर शस्त्रक्रिया करणारे लीलावती रुग्णालयातील(hospital) सर्जन डॉ. नितीन डांगे यांनी सांगितले होते की, चाकूचा अडीच इंचाचा तुकडा सैफच्या पाठीत खोलवर घुसला होता. तो शस्त्रक्रिया करून तातडीने काढावा लागला. चाकू खूपच खोलवर रुतल्याने मज्जातंतूला इजा झाली होती. पाठीतील जे पाणी असते, ते लीक होत होते. तिथे आम्ही ऑपरेशन केले. यामुळे सैफला पॅरालिसिसचा धोका होता. पण तातडीने उपचार केल्यामुळे तो टळला.

सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव मोहम्मद शहजाद असे आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या पोलीस कोठडीत आहे. त्याच्या चौकशीतून असे समोर आले आहे की, त्याने यापूर्वी वांद्र्यात राहणाऱ्या सलमान खान, शाहरुख खान सह अनेक सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती. आरोपी सैफचा मुलगा जहांगीरला (जेह) ओलीस ठेवून पैशांची मागणी करणार होता. मात्र, घरातील सर्वजण जागे झाल्याने तो घाबरला आणि त्याने सैफवर हल्ला केला.

हेही वाचा :

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या डोक्यात नक्की काय?, म्हणाले नवीन रुग्ण मिळाला की ऑपरेशन…

गूढ आजाराची एन्ट्री! 17 जणांचा मृत्यू, अख्खं गाव कँटोनमेंट झोन घोषित

शिवसेना शिंदे गटात दोन गट पडल्याची चर्चा; एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढणार?