तासंतास Instagram Reels पाहणे म्हणजे ‘या’ आजाराला आलिंगन देणे, वेळीच व्हा सावध

टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेक शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप्स आले. पण त्यात सुपरहिट ठरले ते इन्स्ट्राग्राम रील्स(Instagram Reels). आज अनेक इन्फ्लुएन्सर्स या इंस्टग्राम रील्समुळे उदयास आले. तसेच कित्येक जण या अ‍ॅपमुळे चांगला पैसा कमावत आहे. पण जेव्हापासून हे रील्स लोकप्रिय ठरले आहे, तेव्हापासून अनेक जण विशेषकरून तरुण पिढी तासंतास रील्स बघत असते. इतरांसाठी जरी रील्स पाहणे हा विरंगुळा असला तरी यामुळे वेळ कसा निघून जातो हे कोणालाच समजत नाही.

इंस्टाग्राम रील्स(Instagram Reels) स्क्रोल करणे, सोशल मीडियावर मीम्स शेअर करणे, सोशल प्रोफाइल अपडेट करणे आणि रील-लाइफची वास्तविक जीवनाशी तुलना करणे आता सामान्य झाले आहे. सोशल मीडियाचा वापर झपाट्याने वाढला आहे. ज्यामुळे आपल्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतात.

बस, ट्रेन, मेट्रो, घरात, कुटुंबात किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांमधील एक सामान्य सवय म्हणजे प्रत्येकजण त्यांच्या फोनमध्ये व्यस्त असतो. तसेच तासनतास फोन स्क्रोल करण्याची आणि इंस्टा रील्स पाहण्याची सवय आजकाल लोकांना इतकी जडली आहे की त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे.

रात्री जोपताना रील्स पाहणे ही खूप वाईट सवय आहे. यामुळे झोप न लागणे, डोकेदुखी, मायग्रेन इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. रील पाहण्याची ही सवय केवळ तरुणांमध्येच दिसून येत नाही, तर १० ते ५५ वयोगटातील लोकांमध्येही दिसून येते. ज्यामुळे मानसिक आजार दिवसेंदिवस वाढत आहेत.

सुरुवातीच्या तपासणीदरम्यान काही रुग्णांनी मान्य केले की ते सुमारे दीड वर्षांपासून रील्स पाहत आहेत. ज्यामध्ये ते सकाळी उठल्याबरोबर रील पाहण्यास सुरुवात करायचे आणि रात्रीपर्यंत रील पाहत बसायचे. त्याच वेळी, काही लोकांनी मान्य केले की त्यांना WhatsApp वर शेअर केलेले रील्स पाहणे आवडते. जर ते रील पाहत नसेल तर त्यांना विचित्र वाटू लागते. एकीकडे, त्यांना डोकेदुखी होऊ लागते. तसेच कोणतेही काम करावेसे वाटत नाही.

रील पाहिल्याने शरीरात या समस्या सुरू होतात

  • डोळे आणि डोके मध्ये तीव्र वेदना.
  • झोपेत असताना डोळ्यांत प्रकाश जाणवणे.
  • वेळेवर खाणे-पिणे न करणे.

जास्त वेळ रील्स पाहण्यापासून अशाप्रकारे करा स्वतःचे रक्षण

  • जर तुम्हाला या आजारापासून दूर राहायचे असेल तर दररोज कमी रील्स पाहण्याचा प्रयत्न करा.
  • गरज असेल तेव्हाच मोबाईल वापरा.
  • पुस्तके वाचायला सुरुवात करा.
  • मित्र आणि कुटुंबासोबत जास्त वेळ घालवा.

हेही वाचा :

दिवसाची सुरुवात आनंदवार्ताने, पेट्रोल-डिझेलचे दर ‘इतक्या’ रुपयांनी घसरले?

आता फक्त 250 रुपयात चालू करता येणार SIP, लवकरच लागू होणार नियम

स्वबळावर लढण्याचा नारा देत ठाकरे गट पडला आघाडीतून बाहेर : सुप्रिया सुळे