लढा देऊ, पैसे बंद होणार नाही…आम्ही लाडक्या बहि‍णींच्या बाजूने; जयंत पाटील

ऐन विधानसभा निवडणुकीच्या(political) रणधुमाळीत सुरू झालेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना चांगलीच चर्चेत आहेत. यामधून महिलांना दरमहा पंधराशे रूपये निधी दिला जातोय. आतापर्यंत असे सात हप्ते वितरीत करण्यात आलेत. पण निवडणुकीनंतर मात्र या योजनेच्या निकषांमध्ये बदल केला जाणार असल्याचं बोललं जातंय. अनेक महिलांना योजनेतून वगळल्याचं देखील समोर आलंय. यावर आता आम्ही लाडक्या बहि‍णींच्या बाजूने आहोत, अशी भूमिका शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी घेतलीय.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार(political) जयंत पाटील यांनी लाडकी बहीण योजनेवरून महायुती सरकारला टोला लगावला आहे. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, मला फार आनंद होतोय. तुम्ही लाडक्या बहिणी झाल्यामुळं फार चांगली व्यवस्था तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. साडेपाच लाख लाडक्या बहि‍णींची नावं कमी झालीत. हे काय बरोबर नाही. कसं आहे? एकदा दिलं की दिलं, मतं दिली ना माणसांनी त्याच्यावर असा टोला त्यांनी फडणवीस सरकारला लगावला आहे.

आता आम्ही लाडक्या बहि‍णींच्या बाजूने आहोत. त्यामुळे आता दिलेले पंधराशे रूपये कोणत्याही लाडक्या बहिणीचे थांबवता येणार नाहीत, अशी आमची भूमिका आहे. आता पैसे थांबवता येणार नाही, यापुढे आम्ही लाडक्या बहि‍णींच्या बाजूनेच काम करणार आहोत. तुमचे पैसे बंद होणार नाहीत, यासाठी आमचा लढा कायम सुरू राहील. तुम्ही काही चिंता करू नका. आम्ही कायम तुमच्यासोबत असणार, असं आश्वासन आमदार जयंत पाटील यांनी लाडक्या बहि‍णींना दिलंय.

पाच- साडे पाच लाख महिलांची नावं कमी झालीत. अधिक महिलांची नावं कमी होणार नाही, यासाठी तुम्ही राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेच्या बैठकीत आवर्जून सांगा, असं आवाहन देखील जयंत पाटील यांनी केलंय. चूकून झाले. योजनेचे पैसे चालूच ठेवायचे, बंद नाही करायचे. तुम्ही चुकून एखाद्या बंगल्यातील महिलेला पंधराशे रूपये दिले, पण ते दिलेच ना मग चालूच ठेवा, असा टोला जयंत पाटलांनी विरोधकांना लगावला आहे.

ज्यांनी मतदान केलं, त्या लाडक्या बहि‍णींना फसवल्यासारखं वाटता कामा नये, तेवढी व्यवस्था झाली पाहिजे असं देखील जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्यासाठी आम्ही सगळे लाडक्या बहि‍णींच्या मागे उभे राहणार आहोत. हा निरोप आमचा समित कदम साहेब देतील, असा विश्वास असल्याचं ते म्हणाले आहेत. आमचं सरकार आलं असतं तर आम्ही तीन हजार रूपये करणार होतो, असं देखील जयंत पाटील म्हणाले आहेत.

हेही वाचा :

10 वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

कोण आहे ती मुलगी जिच्यासाठी विराट कोहलीने भेदली सुरक्षाव्यवस्था, सर्वांसमोर मिठीत घेतलं

भावानेच केला बहिणीचा घात! प्रेमप्रकरणामुळे कापलं मुंडक अन् गावभर घेऊन फिरू लागला Viral Video