राज्यात आठवड्याच्या शेवटी हवामानाचा अंदाज: काही भागांत पावसाचा तडाखा, काही ठिकाणी विश्रांती

राज्यातील हवामान विभागाच्या (rain)अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरातील पूर्व मध्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. तसेच, गुजरातपासून केरळपर्यंतही अशाच स्थितीमुळे महाराष्ट्रातील हवामानावर थेट परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये पावसाची विश्रांती दिसत असली तरी काही ठिकाणी पाऊस सुरुच राहणार आहे.

पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुणे, रायगड, आणि सातारा या घाटमाथ्याच्या भागात तुरळक पावसाच्या सरींचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात पावसाच्या हलक्या सरी पडतील, तर अंतर्गत भागांमध्ये पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईतही कमाल तापमान 31°C आणि किमान तापमान 26°C राहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील, आणि पाऊस मध्यम राहण्याची शक्यता आहे.

आठवड्याच्या शेवटी काही भागांत पाऊस थोडा विश्रांती घेईल, ज्यामुळे काही ठिकाणी सूर्यनारायणाचे दर्शन होईल. त्यामुळे पावसाळी सहलीसाठी निघणार्यांनी काही ठिकाणी पावसाची हजेरी नसली तरीही निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेऊ शकतील.

हेही वाचा:

केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीमुळे कायदा सुव्यवस्थेला धोका: प्रशासन सतर्क

नोकरी बाजारात तेजी; जुलैमध्ये मागणीत 12 टक्क्यांची विक्रमी वाढ

अबू सालेमची नवी ‘कर्मभूमी’ नशिक कारागृह; सुरक्षेच्या कारणास्तव स्थलांतर