विमानाची चाकं भारताच्या भूमीला लागताच खेळाडूंनी काय केलं?

टी-20 विश्वचषक 2024 ची स्पर्धा जिंकून टीम इंडिया(india national cricket team) आज मायदेशी परतली आहे. सकाळी 6 वाजता टीम इंडियाचं विशेष विमान दिल्लीत दाखल झालं. 29 जून रोजी झालेल्या विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत भारताने तब्बल 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या विजयानंतर भारतीय संघ आज (4 जुलै) भारतात परतला आहे. यावेळी टीम इंडियाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे.

टीम इंडियाचं (india national cricket team)विमान भारतात दाखल होताच बीसीसीआयने खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा, विराट कोहली, शिवम दुबे, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा दिसून येत आहे. हे सर्व खेळाडू एक बॅग उघडून विश्वचषकाची ट्रॉफी हातात घेऊन भारतात दाखल झाल्याचा आनंद व्यक्त करताना दिसत आहे. यावेळी सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत आहे. या व्हिडीओला ‘Its Home’ असं कॅप्शन देण्यात आले आहे.

विश्वचषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती. त्यामुळे एअर इंडियाच्या AIC24WC या विशेष विमानाने भारतात परत आणण्यात आले. आज टीम इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. यानंतर टीम इंडिया दुसऱ्या चार्टर्ड फ्लाइटने मुंबईला रवाना होईल. मुंबईत संध्याकाळी 5 च्या सुमारास विश्वविजेत्यांचा शानदार रोड शो होईल.

भारतीय क्रिकेटमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियमचे विशेष स्थान आहे. याच स्टेडियमवर भारताने 2011 सालचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक उंचावला होता. आता, याच स्टेडियमवर गुरुवारी भारताच्या टी-20 विश्वविजेत्या संघाचाही सन्मान होणार आहे.

https://twitter.com/i/status/1808666655045587254

सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत भेट.
दुपारी 2 वाजता : मुंबईकडे रवाना.
सायंकाळी 5 वाजता : मरिन ड्राइव्हला आगमन,
सायंकाळी 5 वाजता : वानखेडे स्टेडियमच्या दिशेने बस परेड. सायंकाळी ७ वाजल्यापासून: वानखेडे स्टेडियमवर विजयी सोहळा

हेही वाचा :

महाराष्ट्रातील बीबीए, बीसीए अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती?

विश्वविजेत्यांचे मायभूमीवर आगमन: दिल्ली विमानतळावर चाहत्यांचा जल्लोष

पावसाळ्यात आरोग्याची काळजी: आहारात काय ठेवावे आणि काय टाळावे,