काय सांगता! शाहरुख खानने ‘मन्नत’ बंगला सोडला ? नेमकं कारण काय ?

उपस्थित होतीबॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जितका प्रसिद्ध आहे तितकाच (bungalow)त्याचा ‘मन्नत’ बंगलाही तितकाच लोकप्रिय आहे. कोणताही सण असो किंवा शाहरुख खानचा वाढदिवस असो, मन्नतच्या बाहेर चाहत्यांची गर्दी दिसून येते. लोक जेव्हा मुंबईला येतात तेव्हाही ते शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी मन्नतच्या बाहेर नक्कीच एक फेरी मारतात. आता या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. शाहरुख खान आता मन्नत सोडून त्याच्या कुटुंबासह दुसरीकडे जाणार आहे.

शाहरुख खान मन्नत सोडून भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहणार
शाहरुख खान आता मन्नत सोडत आहे हे वाचून अनेक चाहत्यांना धक्का बसला असेल. शाहरुख खान आता त्याच्या कुटुंबासह हा आलिशान बंगला सोडून भाड्याच्या घरात राहणार आहे, हे ऐकून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की खान परिवारासह (bungalow)पाली हिल परिसरात स्थलांतरित होणार आहे आणि अभिनेत्याने वाशु भगनानी यांच्या आलिशान अपार्टमेंटचे ४ मजले भाड्याने घेतले आहेत. पूजा कासा इमारतीतील हे आलिशान अपार्टमेंट आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रत्येक मजल्यावर एक फ्लॅट आहे, पण तो मन्नतइतका मोठा नाही. तरीही, त्याच्या आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी येथे पुरेशी जागा आहे. या फ्लॅट्सचे भाडे शाहरुख खान दरमहा सुमारे २४ लाख रुपये देणार आहे. तसेच, शाहरुख खानने मन्नत कायमची सोडली नाही तर तो तात्पुरता या ठिकाणी राहण्यासाठी गेला आहे.
शाहरुख खानने त्याच्या कुटुंबासह मन्नत सोडण्याचे कारण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, मन्नतमध्ये काही नूतनीकरण आणि(bungalow) विस्ताराचे काम करायचे आहे. ही सर्व कामे मे २०२५ पासून सुरू होतील आणि सुमारे २ वर्षे चालतील. अशा परिस्थितीत, मन्नतमध्ये काही नूतनीकरणाचे काम होईपर्यंत, खान कुटुंबाला दुसरीकडे कुठेतरी स्थलांतरित व्हावे लागणार आहे. मन्नत तयार होताच, शाहरुख त्याची पत्नी गौरी खान आणि त्यांच्या तीन मुलांसह येथे परतणार आहे.
हेही वाचा :
होळीनिमित्त राज्यभरातील रेशन दुकानांवर अन्नधान्सासोबत फ्री साडी वाटप सुरु
लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता येणार
कलाविश्वावर शोकाकळा! ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेते संतोष नलावडे यांचं अपघाती निधन