ज्याची भीती होती तेच झालं! युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला?

गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या(divorced) बातम्या चर्चेत होत्या. मात्र, दोघांनीही याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. ते दोघे विभक्त राहत असल्याच्या चर्चा होत्या आणि त्यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे बोलले जात होते. आता, त्यांच्या घटस्फोटाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

युजवेंद्र आणि धनश्री यांना मुंबईतील वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे. आज दुपारी ४:३० वाजता ते दोघे न्यायाधीशांसमोर हजर राहून कायदेशीर विभक्ततेचे प्रमाणपत्र घेणार असल्याची माहिती आहे. घटस्फोटाचे(divorced) नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
आजच त्यांचा घटस्फोट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सुरू झाल्यानंतर, धनश्रीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. त्यानंतर तिने एक पोस्ट शेअर करून ट्रोलर्सना उत्तर दिले होते.

विशेष म्हणजे, धनश्रीने आपल्या पोस्टमध्ये युजवेंद्र चहलचा उल्लेखही केला नव्हता आणि घटस्फोटाच्या बातम्या अफवा असल्याचेही म्हटले नव्हते. घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना दोघांनीही त्या अफवा असल्याचे नाकारले नाही.
दोघेही सोशल मीडियावर सक्रिय होते, परंतु त्यांनी एकमेकांना अनफॉलो केले. युजवेंद्रने धनश्रीचे फोटोही सोशल मीडियावरुन डिलीट केले. युजवेंद्र चहलला धनश्री वर्माला मोठी पोटगी द्यावी लागू शकते, असेही बोलले जात आहे. धनश्री वर्मा लवकरच एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे.
हेही वाचा :
जोडीदार निवडताना मुलांची ‘या’ मुलींना असते जास्त पसंती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी
लाडकी बहीण योजनेतील तुमचे 1500 रुपये बंद होणार?