चाललंय काय? मामे भावासमोर तरूणीवर सामूहिक बलात्कार VIDEO काढला; अन् मग..

पुण्यातील स्वारगेट बस डेपोत तरूणीसोबत झालेल्या अत्याचारानंतर राज्यात संतापाची (brother)लाट उसळली आहे. स्वारगेट बस डेपोत झालेलं बलात्कार प्रकरण ताजे असतानाच आणखी एका घटनेमुळे पुणे हादरलं आहे.एका तरूणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. ही संतापजनक घटना शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे घडली आहे. एका युवतीवर दोन नराधमांनी लैंगिक अत्याचार केला. नंतर तिच्या अंगावरील सोनं देखील लंपास केलं. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कारेगावात तरूणी आपल्या मामेभावासोबत गप्पा मारण्यासाठी बसली होती. वेळ रात्रीची होती. त्या ठिकाणी दोन आरोपी आले. अमोल पोटे आणि किशोर रामभाऊ काळे असं आरोपींचे नाव आहे. दोन्ही आरोपी मोटारसायकलवरून आले होते. ते दारूच्या नशेत असल्याची माहिती (brother)समोर आली आहे.
आरोपींनी आधी तरूणीला चाकूचा धाक दाखवला. नंतर तरूणीच्या मामेभावाला जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले आणि व्हिडिओ शुट केला. नंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. नराधमांनी त्यानंतर आळीपाळीनं तरूणीसोबत लैंगिक अत्याचार केला.
नराधमांनी तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्यांनी (brother)तरूणीच्या गळ्यातील सोन्याची चैन, नाकातील रिंग आणि काही दागिने हिसकावून घेतले. नंतर आरोपी पसार झाले. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा तपास करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.
हेही वाचा :
कॅन्सरमुळे प्रसिद्ध गायकाचे निधन…
शरद पवारांचा शिलेदार अजितदादांच्या गाडीत, एकत्रित प्रवास अन् राजकीय वर्तुळात चर्चा
मुलाच्या बर्थ डे पार्टीतून गोविंदा गायब; यशवर्धनने आई आणि बहिणीसोबत कापला केक, VIDEO व्हायरल