व्हॉट्सअ‍ॅपमध्ये जबरदस्त फीचरची एंट्री; इंस्टाग्राम सारखं म्युझिक टूल कसं वापराल? 

WhatsApp आपल्या युजर्ससाठी स्टेटस अपडेट अधिक आकर्षक आणि सर्जनशील बनवण्यासाठी नवे क्रिएशन टूल्स(Creation Tools) विकसित करत आहे. ही टूल्स सध्या चाचणी टप्प्यात असून लवकरच अपडेटच्या स्वरूपात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

नव्या अपडेटमुळे स्टेटस अधिक प्रभावी

WhatsApp हा जगातील सर्वात मोठा मेसेजिंग प्लॅटफॉर्म असून 3.5 अब्जांहून अधिक युजर्स आहेत. युजर्सचा अनुभव अधिक सुधारण्यासाठी कंपनी सातत्याने नवनवीन वैशिष्ट्ये आणत आहे. अलीकडेच स्टेटस अपडेटमध्ये म्युझिक आणि मेंशन फिचर जोडले होते. आता WhatsApp युजर्ससाठी आणखी सर्जनशील क्रिएशन टूल्स(Creation Tools) विकसित करत आहे.

बीटा व्हर्जनमध्ये नवे टूल्स उपलब्ध

WABetaInfo च्या अहवालानुसार, अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.25.3.2 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने नव्या स्टेटस क्रिएशन टूल्सची चाचणी सुरू केली आहे. यामध्ये गॅलरी सेक्शनमध्ये दोन नवीन शॉर्टकट्स दिसणार आहेत. हे शॉर्टकट्स विशेषतः टेक्स्ट स्टेटस आणि व्हॉइस मेसेज स्टेटससाठी असतील, ज्यामुळे युजर्सना त्यांच्या अपडेट्स अधिक सहज शेअर करता येतील.

स्वतंत्र व्हॉइस मेसेज स्टेटसचा पर्याय

या अपडेटमधील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे स्वतंत्र व्हॉइस मेसेज स्टेटस पर्याय. सध्या युजर्सना स्टेटसवर व्हॉइस नोट्स जोडण्याचा पर्याय आहे, मात्र त्यासाठी कोणताही खास शॉर्टकट उपलब्ध नाही. आगामी अपडेटमध्ये स्टेटस सेक्शनमध्ये वेगळ्या व्हॉइस मेसेजचा पर्याय उपलब्ध होईल, जो फोटो, व्हिडिओ आणि टेक्स्ट स्टेटसच्या सोबत असेल.

कधी मिळेल ही नवी सुविधा?

सध्या ही सुविधा बीटा चाचणी टप्प्यात असून लवकरच अपडेटच्या स्वरूपात रोलआउट केली जाण्याची शक्यता आहे. WhatsApp आपल्या स्टेटस फिचर्समध्ये सातत्याने सुधारणा करत असून हे नवे टूल्स युजर्सना अधिक सर्जनशीलता आणि लवचिकता प्रदान करतील. अधिकृत लॉन्चसाठी अपडेट्ससाठी लक्ष ठेवा.

हेही वाचा :

पेट्रोल-डिझेलचे नवे दर लागू…

IPL 2025 आधीच RCB चा विराटला मोठा धक्का! 

‘फार्मर’ आयडी शेतकऱ्यांसाठी फायदेशीर, मिळणार 5 मोफत फायदे