‘वंदे भारत’चे चाक ‘या’ जिल्ह्यात तयार करणार; तरुणांना मिळणार मोठा रोजगार

सध्या वंदे भारत ही ट्रेन(train) प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. अशातच आता महाराष्ट्रासह मराठवाड्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भारतात स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प सादर करणे बंद झाले असले तरी रेल्वेचे जाळे दिवसागणिक मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. अशातच आता अनेक नवनवीन रेल्वे ताफ्यात दाखल होत आहे. त्यातीलच एक ट्रेन म्हणजे वंदे भारत.

या ट्रेनला(train) नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. यासंदर्भात लातूर या ठिकाणी रेल्वे कोच कारखाना आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर येथे देखील वंदे भारत ट्रेनचे पार्ट्स तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता तरुणाईला नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील पंचतारांकित शेंद्रा एमआयडीसीमध्ये याविषयीचा प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे. यावेळी शेंद्रा एमआयडीसीमधील Bonatrans India wheelset plant या कंपनीत वंदे भारत ट्रेनचे पार्ट तयार करण्याचा लवकरच श्रीगणेशा होणार आहे. त्यामुळे आता या माध्यमातून महाराष्ट्रासह छत्रपती संभाजीनगर येथील हजारो तरुणांच्या हाताला रोजगार मिळणार आहे.

शेंद्रा एमआयडीसीमध्ये वंदे भारत ट्रेनचे पार्टस तयार करण्याचे काम लवकरच सुरु होणार आहे. ज्युपिटर वॅगन्सच्या सहकार्याने तात्राव्यागोंका यांची ज्युपिटर तात्राव्यागोंका ही कंपनी Bonatrans India wheelset plant या नावाने हा मोठा प्रकल्प सुरू करणार आहेत. या प्रकल्पासाठी तब्ब्ल 100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. तसेच हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे. त्या माध्यमातून तरुणांच्या हाताला देखील रोजगार मिळणार आहे.

वंदे भारतसह इतर ट्रेनच्या चाकांची देखील निर्मिती या प्रकल्पात करण्यात येणार आहे. तर भारतात ही कंपनी प्रथमच स्थानिक बाजारपेठ आणि परदेशासाठी व्हीलसेट तयार करणार आहे. या प्रकल्पात महिन्याकाठी तब्ब्ल 1 हजार इतके व्हील सेट तयार करण्याची क्षमता असणार आहे. तसेच येत्या दोन वर्षात या प्रकल्पातून महिन्याकाठी तब्बल 5 हजार व्हील सेट तयार करण्यात येणार आहे.

याशिवाय भारतात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. तर जगातून ही रेल्वे चाकांची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे या प्रकल्पातून ही मागणी पूर्ण करण्यावर देखील भर देण्यात येत आहे. त्यामुळे आता लातूरनंतर मराठवाड्यात म्हणजेच छत्रपती संभाजीनगरला एक मोठा उद्योग आल्याने उद्योगांना चालना मिळणार आहे.

हेही वाचा:

संतापजनक! रीलसाठी तरूणांनी वृद्ध व्यक्तीला…Video

महाविकास आघाडी नाना पटोलेंना मुख्यमंत्री करणार?

मोठी बातमी! आता लवकरच लाडक्या बहिणींना तिसरा हप्ता मिळणार