मी चौथीत असताना बिड्या प्यायचो चक्कर येऊन पडायचो माजी मंत्रीचा VIDEO

लहानपणी मी फार वांड होतो, चौथीत असताना मी बिड्या पित होतो, (smoking)असा खळबळजनक खुलासा विजय शिवातरे यांनी स्वत: बद्दल केला आहे.माजी मंत्री विजय शिवतारे त्यांच्या एका व्हिडिओमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात मी उभा राहणार असं शिवतारे यांनी जाहीर केलं होतं. नंतर त्यांनी माघार घेतली. थेट अजित पवारांना आव्हान देणारे शिवतारे आता शाळेतील जुन्या आठवणी सांगताना भलतेच चर्चेचा विषय ठरले आहेत.

लहानपणी मी फार वांड होतो, चौथीत असताना मी बिड्या पित होतो, असा खळबळजनक खुलासा विजय शिवातरे यांनी स्वत: बद्दल केला आहे. सासवड येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात शिवतारे आज उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधीत केले. विद्यार्थ्यांसमोर भाषण करताना शिवतारेंना त्यांचं बालपण आठवलं. आठवणीतल्या गोष्टी त्यांनी भाषणातून सर्वांना सांगितल्या(smoking) अन् तेथेच टाळ्यांच्या कडकडाटासह एकच हशा पिकला.

विजय शिवतारे म्हणाले की, चौथीत असताना मी जनावरे वळायला जायचो. त्यावेळी आईच्या पिशवीतून पैसे चोरून बिड्या आणायचो आणि ओढायचो. बिडी ओढली की चक्कर येऊन पडायचो, असा खुलासा देखील माजी मंत्री विजय शिवतारे यांनी केला आहे. विजय शिवातरे यांनी सासवडमधील आचार्य अत्रे सभागृहात आज गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते.

“मी बंडखोर होतो मात्र तरीही मी पहिल्या क्रमांकावर होतो.(smoking) मी अभ्यास नाही करायचो. तुम्ही आत्ताही माझ्या शाळेत गेलात तरीही माझं नाव तेथे आहे.एक दिवस डुप्लिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढण्यासाठी शाळेत गेलो होतो.”, असंही शिवतारे म्हणाले.

पण हे सांगताना मी अभ्यास न करता शाळेत हुशार असल्याचेही विजय शिवतारे यांनी लगेचच विद्यार्थ्यांना सांगितले आहे. विजय शिवतारेंच्या या भाषणामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्ग आणि उपस्थित सर्वांमध्ये एकच हशा सुरू झाला होता.

हेही वाचा :

गुटखा न दिल्याने तरुणावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉड, दांडक्याने बेदम मारहाण

“एक १५० ची तर दुसरी २०० ची..” विदेशी महिलांविषयी तरुणाने केलेल्या ‘त्या’ विधानावरुन नेटीझन्स संतापले

राजू शेट्टी यांची घोषणा, राज्यात १ जुलै पासून वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन सुरू

सोने-चांदीचा भाव जोरदार घसरला वाचा महाराष्ट्रात कितीने स्वस्त झाल्या किंमती

Video ओरडली किंचाळत राहिली मदतीला कोणीही नाही महिलेवर हल्ला