2100 रुपये कधी मिळणार?, लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर

‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये प्रतिमहिना मानधन (update)देण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. मात्र, अर्थसंकल्पात याबद्दल कोणतीही घोषणा न झाल्याने महिलांमध्ये नाराजी होती. आता महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत यासंदर्भात माहिती दिली आहे.

आदिती तटकरे यांची विधानसभेत माहिती :
ऑक्टोबर 2024 मध्ये विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी 2 कोटी 47 लाख महिलांना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळेल. या योजनेच्या लाभार्थ्यांना 2100 रुपये मदत देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल.नमो सन्मान योजनेचा लाभ मिळणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा(update) लाभ मिळणार नाही, पण अशा महिलांना एक हजार रुपये नमो सन्मान योजनेतून आणि पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेतून दिले जातील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 33 लाख 232 हजार कोटी रुपये खर्च झाला आहे. पुढील वर्षांसाठी 36 लाख कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. आगामी वर्षात(update) 24 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
हेही वाचा :
प्रेमसंबंधांना गावकऱ्यांचा विरोध, महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी
पालकांची धाकधुक वाढवणारी बातमी! यंदा शाळांचे…
यंदाचा गुढीपाडवा नशीब पालटणारा! या 5 राशींचा गोल्डन टाईम सुरू होतोय