PM किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी जमा होणार?

केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच नवनवीन योजना(Yojana) राबवत आहे. कारण शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी सरकार योजना आखत आहे. अशातच यामधील एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना.

या योजनेच्या(Yojana) माध्यमातून सरकार दरवर्षी लाभार्थी शेतकऱ्यांना खात्यावर 6000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. या योजनेचे आत्तापर्यंत तब्बल 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील झाले आहेत. अशातच आता18 वा हप्ता कधी मिळणार याची सध्या चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे. मात्र लवकरच 18 वा हप्ता देखील मिळणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आता 18 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीच्या गरजा सहजरित्या पूर्ण करु शकतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील असे सरकारचे धोरण आहे.

मात्र आतापर्यंत सरकारने 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. तर आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 18वा हप्ता पुढील महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो. मात्र आता देशातील शेतकऱ्यांना काही नवीन सूचनांच पालन करावं लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेयचा आहे त्यांना ई-केवायसी आणि जमीन पडताळणी करावी लागणार आहे.

ज्या शेतकऱ्यांनी दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास त्यांना 18 व्या हप्त्याची 2000 रुपये मिळणार नाहीत. त्यामुळं शेतकऱ्यांनो लवकरात लवकर दिलेल्या सूचनेप्रमाणे कामे पूर्ण करुन घ्यावीत असं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच त्यासाठी तुम्ही ई-केवायसीची प्रक्रिया देखील खूप सोपी झाली आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या पीएम किसान मोबाइल ॲपमध्ये ‘फेस ऑथेंटिकेशन फीचर’ उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने शेतकरी आता घरबसल्या OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई-केवायसी करू शकतात.

हेही वाचा:

Finally घटस्पोटांच्या अफवांवर ऐश्वर्या रायचा खुलासा, व्हिडीओ होतोय व्हायरल

महिलांसाठी मद्यपान करणं किती सुरक्षित आहे? मद्यपान करण्यात स्त्रियाही अव्वल

संभाजीराजेंचा सरकारला इशारा; काही झालं तर सरकार जबाबदार