लाडक्या बहि‍णींच्या खात्यात फेब्रुवारी- मार्चचे पैसे कधी येणार? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. लाडकी (watching)बहीण योजनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा हप्ता कधी देणार याबाबत मोठी घोषणा आदिती तटकरेंनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च रोजी देण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, मार्च महिन्यात दोन हप्ते महिलांना मिळणार आहेत. मार्च महिन्याचाही हप्ता लगेचच महिलांना मिळणार आहे.फेब्रुवारीचा हप्ता ८ मार्चला दिला जाणार आहे. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात मार्च महिन्याचा हप्ता देण्यात येईल, असं आदिती तटकरेंनी सांगितले आहे. अर्थसंकल्पीय (watching)अधिवेशन हे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत आहे. त्यामुळे या काळात कधीही लाडक्या बहि‍णींना मार्च महिन्याचे १५०० रुपये दिले जाऊ शकतात.त्यामुळे मार्च महिन्यात महिलांना ३००० रुपये मिळणार आहे.

महिला दिनाचा मूहूर्त साधून लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे. महायुती सरकार लाडकी बहीण योजना सक्षमरित्या सुरु ठेवणार आहे. या योजनेत सुमारे अडीच कोटी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळणार आहे, असंही आदिती तटकरेंनी सांगितलं.लाडकी बहीण योजनेत (watching)२१०० रुपये देण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले होते. दरम्यान, आता लाडकी बहिण योजनेच्या २१०० रुपयांबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाऊ शकतो. जर अर्थसंकल्पात निर्णय झाला तर पुढच्या २-३ महिन्यात लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये मिळतील.

हेही वाचा :

ज्याची भीती होती तेच झालं, बाबा वेंगांची पहिली भविष्यवाणी झाली खरी

सोशल मीडियावर तरुणीशी फ्लर्ट करतोय आर.माधवन?

महिला दिनी लाडक्या बहि‍णींना खुशखबर! ८ तारखेला ३००० रुपये देणार